बीड

नायगाव येथील युवक नेते पै.युवराज उगले यांचा अभिष्टचिंतन सोहळा विविध उपक्रमांने साजरा

नायगाव येथील युवक नेते पै.युवराज उगले यांचा अभिष्टचिंतन सोहळा विविध उपक्रमांने साजरा

जामखेड प्रतिनिधी;-जामखेड तालुक्यातील नायगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक नेते व आमदार रोहित दादा पवार यांचे कट्टर समर्थक पै.युवराज उगले यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा विविध उपक्रमांने साजरा करण्यात आला.

नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे युवराज उगले यांनी चालू वर्षीच्या वाढदिवसानिमित्त नायगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उगलेवस्ती व नायगांव या दोन शाळासाठी HP कंपनीचे सुमारे 40 हजार किंमतिचे दोन लेझर प्रिंटर भेट दिले.
दरवर्षी स्वतःच्या व आमदार रोहित दादा पवार यांच्या वाढदिवशी शालेय साहित्य,खाऊ वाटप इ. सहकार्य ते करत असतात.गावातील रयत शिक्षण संस्थाच्या पंचक्रोशी विद्यालयात CCTV बसवण्यायासाठी सुद्धा त्यांनी भरीव सहकार्य केल आहे.त्याचबरोबर गावातील सर्व दुकाने व होटेल्स साठी डस्टबिन,आनंदवाड़ी येथे सप्ताहात आर्थिक सहकार्य, क्रिकेट टूर्नामेंट साठी बक्षीस अशा विविध सामजिक व धार्मिक उपक्रमात सहकार्य करण्यात अग्रेसर असतात.
श्रीनाथ कंस्ट्रक्शनच्या माध्यमातून महाराष्ट्रात विविध भागात विकासकामे करतात.त्यांनी व बंधु राहुल उगले यांनी सुमारे अडीच एकरचे शेततलाव केला असून शेतात द्राक्ष,आंबा,डाळीब व ऊस लागवड केलेली आहे.सध्या शेळीपालन व्यवसाय देखील सुरुवात केली आहे.तालुक्यातील एक प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांची वेगळी ओळख निर्माण झालेली आहे.
नायगांव मधील सर्व ग्रामस्थ, नायगांव व उगलेवस्ती शाळेतील शाळा व्यवस्थापन समिति अध्यक्ष, उपाध्यक्ष,सर्व सदस्य, पालक व सर्व विद्यार्थी यांच्या उपस्थितित मोठ्या थाटामाटात आज त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

Back to top button