📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

अखेर पावसाळ्यात बदाबदा गळणा-या जिल्हा परिषदेच्या हनुमान वस्तीवरील शाळेला  सुरक्षित छप्पर मिळाले ; शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाली :- डॉ.गणेश ढवळे 

अखेर पावसाळ्यात बदाबदा गळणा-या जिल्हा परिषदेच्या हनुमान वस्तीवरील शाळेला  सुरक्षित छप्पर मिळाले ; शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाली :- डॉ.गणेश ढवळे
—-
बीड:- ( दि.०४ ) केज तालुक्यातील मौजे लव्हरी या गावापासून ५ किलोमीटर अंतरावरील हनुमान वस्ती शाळा तब्बल १२ वर्षांपासून मोडकळीस आलेल्या जीर्णावस्थेत असलेल्या गंजलेले पत्रे,फूटलेल्या फरश्या आणि पावसाळ्यात बदाबदा गळणा-या   ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करावे लागत असे. शाळेचे मुख्याध्यापक गोकुळ सारूक यांनी शिक्षण विभागाला वारंवार पाठपुरावा करूनही शाळेच्या इमारतीसाठी बांधकाम निधी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत असुन पावसाळ्यात पाऊस पडल्यानंतर शाळेला सुट्टी द्यावी लागत असल्याचे शिक्षकांनी डॉ.गणेश ढवळे यांच्याशी संपर्क साधत लक्ष देण्याची विनंती केली होती. या अनुषंगाने डॉ.गणेश ढवळे यांनी जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाशी लेखी निवेदनाद्वारे मागणी केल्यानंतर अखेर शाळेची दुरूस्ती करण्यात आली असुन गंजलेले पत्रे बदलुन नवे टाकण्यात आले आहेत त्यामुळे अखेर पावसाळ्यात बदाबदा गळणा-या शाळेतील विद्यार्थ्यांचा त्रास कमी होणार आहे.
सविस्तर माहितीस्तव
——
केज तालुक्यातील मौजे लव्हरी या गावापासून ५ किलोमीटर अंतरावरील हनुमान वस्ती शाळा ही २००६ साली तत्कालीन आ.केशवराव आंधळे यांनी डोंगरी विकास निधीतून ग्रामपंचायत साठी दिलेल्या खोलीत २०१३ सालापासून भरत होती.शाळेची खोली जीर्णावस्थेत असुन गंजलेले व छिद्रे पडलेले पत्रे, फुटक्या फरश्या अशा दुरावस्थेत असलेल्या खोलीत विद्यार्थी ज्ञानार्जन करत होते.जवळपास ऊसतोड मजूर असलेल्या ४०० च्या जवळपास लोकसंख्या असलेल्या हनुमान वस्ती येथील शाळेत २०१३ पासुन २०२२ पर्यंत विद्यार्थी पटसंख्या ४० च्या आसपास होती.मात्र गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्याने पालकांनी ईतरत्र मुले शिक्षणासाठी टाकल्याने विद्यार्थी पटसंख्या ११ पर्यंत येऊन ठेपली. पावसाळ्यात शाळा बदाबदा गळत असल्याने आणि जवळपास निवारा नसल्याने पावसाचा अंदाज बघुन विद्यार्थ्यांना सुट्टी द्यावी लागत असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक गोकुळ सारुख यांनी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्याशी संपर्क करत सांगितले व शाळेच्या असुविधांबाबत शिक्षण विभागाशी संपर्क साधण्याची विनंती केली.त्यानंतर डॉ.गणेश ढवळे यांनी जिल्हा प्रशासन व शिक्षण विभागाशी लेखी पत्रव्यवहार केल्यानंतर अखेर शाळेसाठी नविन छप्पर मिळाले असुन विद्यार्थ्यांची पावसाळ्यात गैरसोय होणार नाही याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
Back to top button