बीड
राजपिंप्री पंचायत समिती गणातून ऊमेश शिंदे शिवसेनेच्या वतीने मैदानात…

राजपिंप्री पंचायत समिती गणातून ऊमेश शिंदे शिवसेनेच्या वतीने मैदानात…
दोन माजी मुख्यमंत्र्यांसह आमदारांच्या संपर्कात राहणारे नेतृत्व
कोळगाव, बाळासाहेब घाडगे – गेवराई तालुक्यातील धोंडराई जिल्हा परिषद गटातील राजप्रिंपी पंचायत समिती गणातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू शिवसैनिक आणि गेवराई युवासेना विधानसभा अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे कट्टर समर्थक ऊमेश शिंदे निवडणूक लढवत मैदानात उतरणार असून या युवा कार्यकर्त्यांची सोशल मीडियासह जनतेतून जोरदार चर्चा आहे. दोन दोन माजी मुख्यमंत्र्यांसह आमदारांच्या संपर्कात राहणारे नेतृत्व धोंडराईसह खळेगाव राजपिंप्री गणात परिचित नेतृत्व म्हणून ऊमेश शिंदे यांच्याकडे पाहिले जाते.
सन – २०२५ मध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आरक्षण घोषित केले आहे. जाहीर झालेल्या प्रारूप आराखड्यांतर्गत गेवराई तालुक्यातील जिल्हा परिषद गटातील धोंडराई गटातील राजप्रिंपी या पंचायत समिती गणातून खळेगाव येथील भुमिपुञ तथा विविध कार्यात अग्रेसर असलेले ऊमेश शिंदे या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. ऊमेश शिंदे हे महाविद्यालयीन जीवनापासूनच ते समाज कार्यात नेहमीच अग्रेसर असून दोन दोन माजी मुख्यमंत्री नारायण राणे, एकनाथ शिंदे साहेब, राज्यमंत्री नितेश राणे, आमदार राणे बंधू, कॅबिनेट मंत्री शंभूराजे देसाई यांच्या संपर्कात राहून सामाजिक कार्यात मदत करत आहे. त्याचबरोबर निलेश राणे युवा मंच चे यांच्या मार्गदर्शनाखाली गाव परिसरात विविध समस्या संदर्भात, रस्ते तसेच गावानजीकचे शासकीय कामे चांगले व्हावेत या सारख्या वेगवेगळ्या समस्या संदर्भात आवाज उठविणारे ऊमेश शिंदे आश्वासन नेतृत्व आहे. मागील अनेक वर्षांपासून ते निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम करत असून एकनाथ शिंदे यांच्या शिवेसेनेच्या युवासेना माध्यमातून राजपिंप्री गणात खळेगाव , माटेगाव, देवपिंप्री , राजपिंप्री , ब्रम्हगाव, कुंभेजळगाव, बेलगाव, भोसगाव समाज उपयोगी काम केले आहेत. तसेच मागील अनेक वर्षांपासून शेतकरी चळवळ व सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत.
तसेच शेती विषयीचे प्रश्न त्यांनी तालुका, जिल्हा तसेच मुख्यमंत्री मंत्रालयापर्यंत निवेदनाद्वारे मांडले आहेत.
गारपीट असो अथवा पिक विमा या विषयी त्यांनी मोठा लढा दिला आहे. आता ते शिवसेना या पक्षात सक्रिय असून या पक्षाच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्न ते मार्गी लावण्यासाठी येणाऱ्या पंचायत समिती निवडणूक लढवणार आहेत. या युवा कार्यकर्त्यांची सोशल मीडियासह जनतेतून जोरदार चर्चा आहे.



