जामखेड नगरपरिषदेच्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या विरोधात नागरिकांचा अनोखा निषेध

जामखेड नगरपरिषदेच्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या विरोधात नागरिकांचा अनोखा निषेध
जामखेड (प्रतिनिधी) – शहरातील सदाफुले वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलांची शाळा लगत असलेल्या संरक्षक भिंतीवर नागरिकाने थेट लघुशंका करून जामखेड नगरपरिषदेच्या स्वच्छता व्यवस्थेचा निषेध नोंदवला.
शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढिग, उघड्यावर शौचास जाण्याचे प्रमाण, तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहे अस्वच्छ व निकृष्ट अवस्थेत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. स्वच्छ सर्वेक्षणासाठी फलक लावून खोटा देखावा करण्यात येतो, प्रत्यक्षात मात्र घाणीचे साम्राज्य आहे, अशी तक्रार स्थानिकांनी केली.
या प्रकारामुळे शाळेजवळ अस्वच्छता वाढण्याचा धोका निर्माण झाला असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्यालाही याचा फटका बसू शकतो.
नगरपरिषद प्रशासनाने वेळेत उपाययोजना न केल्यास अजून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
*चौकट*
जामखेड शहरात भिंतीवर मोठ्या प्रमाणावर स्वच्छतेविषयी जामखेड नगर परिषदेने मोठा खर्च करून पेटींग द्वारे जनजागृती आहे, पंरतु प्रत्यक्षात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीग, रस्त्यावर मोकाट जनावरे, गटारी तुंबलेल्या,मुताऱ्या घाण आहेत.डास ,दुर्गंधी तसेच अस्वच्छतेचा किळसवाणा प्रकार शहरात दिसून येत आहे.अशी नागरिकांनी तक्रार केली आहे.



