सौ.के.एस.के. काकु कृषि महाविद्यालच्या पंधरा विद्यार्थ्यांची पुण्याच्या नामांकित कंपनीमध्ये कॅम्पस मुलाखती द्वारे झाली निवड

सौ.के.एस.के. काकु कृषि महाविद्यालच्या पंधरा विद्यार्थ्यांची पुण्याच्या नामांकित कंपनीमध्ये कॅम्पस मुलाखती द्वारे झाली निवड
श्री अनंत कृषी विकास प्रतिष्ठान या संस्थेच्या सौ. के.एस.के काकू कृषि महाविद्यालय, बीड या ठिकाणी नुकतेच वेटरीना हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या कंपनीच्या वतीने व्हेटर्नरी सेल्स ऑफिसर व सेल्स ऑफिसर या पदाकरिता महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी या कॅम्पस मुलाखतीचे आयोजन दिनांक 09 जानेवारी २०२५, गुरुवार रोजी केले होते. मुलाखतीस उपस्थित विद्यार्थ्यांपैकी पंधरा विद्यार्थ्यांची निवड कंपनीमार्फत करण्यात आलेली आहे. ही कंपनी पशु आहार क्षेत्रामध्ये गरजेप्रमाणे आहारपूरक घटक बनवते, शेतकऱ्याना दुग्ध व्यवसाय फायदेशीर मार्गदर्शन करते तसेच वेटझोनच्या माध्यमातून, उत्पादने शेतकऱ्यांच्या दारात पोचवते. कंपनीच्या वतीने श्री अमित शिंदे, नॅशनल सेल्स ऑफिसर आणि श्री युवराज खरात, झोनल सेल्स ऑफिसर यांनी या मुलाखती घेतल्या होत्या. व्हेटर्नरी सेल्स ऑफिसर या पदाकरिता प्रदीप राठोड, सिद्धांत मोरे, प्रसाद कोकरे, आशीर्वाद चौधरी, वैभव बांगर, अविष्कार इंदुरे, रोहन चव्हाण, आशिष अलगट, ओंकार चव्हाण व ओंकार मसवडे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे तर सेल्स ऑफिसर या पदाकरिता सुरज गवारे, अभिषेक खाकरे, श्रीवत्स व आदेश यादव या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थी व पालक यांनी समाधान व्यक्त केले. कृषि अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर खासगी क्षेत्रासह सरकारी क्षेत्रातही रोजगाराच्या संधी शहरी व ग्रामीण भागातील युवकांसाठी उपलब्ध आहेत, त्यासाठी युवकांना कृषिविषयक शिक्षण आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. या महाविद्यालयामार्फत सातत्याने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास आणि सर्वांगीण विकासाकरिता नेहमीच प्रयत्न केले जातात. विविध कंपन्यांना लागणारी कुशलता विचारात घेऊन त्याबद्दलचे मार्गदर्शन केले जाते. याचा नेहमीच विद्यार्थ्यांना फायदा होतो. त्याचेच फलित म्हणजे या पंधरा विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखती मधून निवड झाली आहे असे प्रतिपादन संस्थेचे सहसचिव डॉ. गोविंद साळुंके यांनी केले. तसेच कॅम्पस मुलाखतीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत विविध क्षेत्रातील नोकरीसाठी कॅम्पस मुलाखतींचे आयोजन केले जाते. या कॅम्पस मुलाखतीचे नियोजन ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाचे प्रमुख डॉ. एस.टी. शिंदे यांनी केले. या यशाबद्दल संस्थेचे सचिव मा. जयदत्तजी अण्णा क्षीरसागर यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.



