बीड
पिकविमा ,कर्जमाफी मिळेपर्यंत शेतकरी हक्क मोर्चा संघर्ष करणार:- राजेंद्र आमटे

पिकविमा ,कर्जमाफी मिळेपर्यंत शेतकरी हक्क मोर्चा संघर्ष करणार:- राजेंद्र आमटे
म्हासापूर येथे कर्जमाफी शासन निर्णयाची होळी
बीड ( प्रतिनिधी) पंढरपूर येथील आंदोलनानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीतील अटी शर्ती काढून टाकून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ असा रोहित दादा पवार व रविकांत भाऊ तुपकर दिलेला शब्द सरकारने पाळलेला नाही यामुळे शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने फसव्या कर्जमाफीच्या शासन निर्णयाची म्हासापूर या ठिकाणी होळी करण्यात आली शासन निर्णयाची होळी करत असताना शेतकरी पुत्र राजेंद्र आमटे यांनी जोपर्यंत संपूर्ण बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याला मागील पिक विमा व शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत शेतकरी हक्क मोर्चा हा शासनाच्या विरोधामध्ये लढणार असल्याचे प्रतिपादन शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे यांनी केले
मागील वर्षी अतिवृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रभर हा आकार माजवला होता यामध्ये बीड जिल्ह्यात सर्वाधिक अतिवृष्टी होऊन बीड जिल्ह्यातील गावची गाव आहे हे पाण्याखाली गेली होती पिकाचे अतोनात नुकसान झाले तरीही मागील वर्षी चा पिक विमा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना का मिळत नाही बीड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान होऊ नये पिक विमा लाभा मधून बीड जिल्हा का वगळण्यात आला असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात उपस्थित होत आहे जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत कर्जमाफीचा लाभ व बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याला पिक विमा मिळणार नाही तोपर्यंत शेतकरी हक्क मोर्चा गावोगावी जाऊन शासनाच्या विरोधामध्ये कर्जमाफी जीआर ची होळी करून पिक विमा करिता जनजागृती अभियान राबवणार आहे
बीड जिल्ह्यातील म्हासापूर या ठिकाणी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने शासनाच्या फसव्या कर्जमाफीच्या जीआर ची होळी करण्यात आली यावेळी शेतकरी पुत्र राजेंद्र आमटे, युवा नेते नितीन खांडे, नवनाथ राऊत, गणेश राऊत, अजय खांडे, कृष्णा खांडे ,अशोक राऊत, अनिकेत खांडे, सखाराम खांडे, कलीम शेख, पोपट कुरडे, पिंटू राऊत, पिंटू खांडे, कल्याण राऊत,श्रीकृष्ण पाटोळे, रामेश्वर राऊत, त्रिंबक खांडे, राजेंद्र राठोड, अतुल राऊत, सचिन खांडे आदी उपस्थित होते



