संपादकीय

” महाराष्ट्र बंद’ची हाक देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने ३ हजार कोटीची नुसकीन भरपाई द्यावी”

 

११ ऑक्टोबरला सत्ताधारी महाविकास आघाडीने शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. तसेच महाराष्ट्र बंदमुळे झालेले ३ हजार कोटींचे नुकसान याच सरकारने भरून द्यावे अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयाकडे करणारी याचिका करण्यात आली आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांनी लखीमपूर, उत्तरप्रदेशमधील शेतकऱ्यांना चिरडण्याच्या घटनेच्या निषेधार्थ हा बंद पुकारला होता.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त ज्युलिओ रिबेरो (९२), कार्यकर्ते गर्सन डिकुन्हा (९२) माजी पालिका आयुक्त द. म. सुकथनकर (८९) आणि अर्बन डिझाइन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे विश्वस्त सायरस गझदर (७६) यांनी ही याचिका दाखल केली आहे. लवकरच त्याची सुनावणी होणार आहे. या याचिकेमुळे महाविकास आघाडीच्या अडचणी वाढताना दिसून येणार आहे.

या याचिकेत म्हटले आहे की, या बंदमुळे महाराष्ट्राचे जवळपास २७२३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी महाराष्ट्राच्या झालेले नुकसान भरून द्यावे. बंदमुळे झालेल्या नुकसानीसाठी निधी उभा करून चार आठवड्यांत हे पैस द्यावेत. तसेच या याचिकेत नमूद करण्यात आले आहे की, महाविकास आघाडीने केलेल्या या बंदमुळे नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आली, त्यांच्या अधिकारांवर गदा आली. अनेकांचा रोजगार बुडाला तसेच त्यांच्या संपत्तीचे नुकसानही या बंददरम्यान झाले.

Back to top button