बीड

हवाई कारवाई योग्यच – रमेश गुगळे यांची प्रतिक्रिया

हवाई कारवाई योग्यच – रमेश गुगळे यांची प्रतिक्रिया

जामखेड प्रतिनिधी ७ मे: भारतीय वायुदलाच्या हवाई कारवाईवर प्रतिक्रिया देताना रमेश गुगळे म्हणाले हवाई कारवाई योग्यच असून ती कारवाई संपूर्ण देशाच्या आत्मसन्मानाचे आणि न्यायाच्या भावनेचे प्रतीक असल्याचं म्हटलं आहे. “ही केवळ सैनिकी कारवाई नव्हती, ती श्रद्धांजली होती.शहीद जवानांच्या रक्ताला दिलेलं उत्तर होती,” अशा शब्दांत त्यांनी आपली भावना व्यक्त केली.
भारतीय वायुदलाच्या कार्यप्रणालीचं कौतुक करत गुगळे म्हणाले की, “आपल्या जवानांनी सीमापार जाऊन केवळ शत्रूंना प्रत्युत्तर दिलं नाही, तर प्रत्येक भारतीयाच्या मनात साचलेल्या वेदनांनाही आवाज दिला. ही कारवाई केवळ रणनीती नव्हती, तर ती राष्ट्रभावनेचा उद्गार होती.”

गुगळे यांनी सांगितलं की, “त्या रात्री आभाळ गडगडलं, पण तो गडगडाट रागाचा नव्हता.तो न्यायाचा होता. देशाने आपल्या जवानांचा अपमान सहन केला नाही. त्यांच्या रक्ताचा प्रत्येक थेंब सरकारने आणि सैन्याने लक्षात ठेवला.ज्यावेळी निर्दोष जवानांवर हल्ला होतो, तेव्हा फक्त एकट्या कुटुंबाचं नाही, तर संपूर्ण राष्ट्राचं हृदय तुटतं. निर्दोष जवानांवर जेव्हा भ्याड हल्ला झाला, तेव्हा तो हल्ला संपूर्ण देशावर झाला होता. एका आईच्या कुशीतलं लेकरू परत आलं, पण तिरंग्यात गुंडाळून. त्या प्रत्येक अश्रूला, त्या प्रत्येक थेंबाला उत्तर देणारी ही कारवाई होती.

Back to top button