संपादकीय

अधिकाऱ्यांना धमकी देणं चुकीचं, ड्रग्ज प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची या प्रकरणावर प्रतिक्रिया

 

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखडे यांच्यावर बनावट डॉक्युमेंट्सच्या आधारे नोकरी मिळवल्याचा आरोप केला होता. यासोबतच नवाब मलिकांनी समीर वानखेडे यांच्यावर इतरही अनेक गंभीर आरोप लावले आहेत. आता या प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत थेट नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे.

ते म्हणाले की, अधिकाऱ्यांना धमकी देणं चुकीचं आहे ते आपलं काम करत आहे पण त्यांच्या कामात एक जबाबदार मंत्री म्हणून किती हस्तक्षेप कार्याचा हे मंत्रो महोदयांना समजले पाहिजे ते दादरा नगर हवेली येथे लोकसभा पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या प्रचारादरम्यान बोलत होते यावेळी त्यांनी शिवसेना पक्षावर सुद्धा टीका केली होती

फडणवीस म्हणाले की शिवसेना दादरा नगर-हवेलीत मृत्यूच्या लाटेचं राजकारण करत आहे. शिवसेना संधीसाधू आहे. पंतप्रधान मोदींच्या नावावर 56 जागा मिळाल्या आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले असे हे संधीसाधू आहेत अशी टीका त्यांनी केली होती आता या टीकेला शिवसेना काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागणार आहे

Back to top button