📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

आज आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये भव्य हृदयरोग तपासणी शिबिर

आज आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये भव्य हृदयरोग तपासणी शिबिर

बीडचे भूमिपुत्र DNB (Cardiology) डॉ. अमित भराडिया यांची विशेष उपस्थिती; तज्ज्ञ तपासणी ₹२००, 2D Echo फक्त ₹९००

बीड (प्रतिनिधी) : जैन सोशल फेडरेशन, अहमदनगर संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल, बीड यांच्या वतीने आज रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत भव्य हृदयरोग तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जालना रोड, शाहू बँकेजवळील आनंदऋषीजी डायग्नोस्टिक सेंटर येथे हे शिबिर होणार आहे.

या शिबिरासाठी बीडचे भूमिपुत्र, DNB (Cardiology) हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अमित भराडिया यांची विशेष उपस्थिती राहणार असून, त्यांच्या माध्यमातून रुग्णांची हृदयरोग तपासणी, उपचाराबाबत मार्गदर्शन तसेच आवश्यक असल्यास पुढील उपचारांची माहिती देण्यात येणार आहे.

छातीत दुखणे, छाती जड होणे, दम लागणे, जास्त घाम येणे, चक्कर येणे, हृदयाची धडधड वाढणे यांसारखी लक्षणे जाणवत असल्यास ती दुर्लक्षित न करता वेळेत हृदयरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अशा रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शिबिरामध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, हृदयातील झडपा बदलणे, हृदयातील छिद्र बुजविणे तसेच विविध हृदयरोगांवरील उपचार व शस्त्रक्रियांबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

पात्र रुग्णांसाठी उपचार व शस्त्रक्रिया मोफत

MJPJAY व PMJAY अंतर्गत पात्र रुग्णांना योजनेच्या नियमानुसार आवश्यक हृदयावरील उपचार व शस्त्रक्रिया मोफत उपलब्ध होऊ शकतात. आर्थिक अडचणीमुळे उपचार घेण्यास विलंब करणाऱ्या पात्र रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.

शिबिरातील विशेष शुल्क

  • हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टरांची तपासणी व सल्ला – ₹२००
  • 2D Echo – फक्त ₹९००

महिन्यातून दोनदा हृदयरोग तज्ज्ञांची सेवा

बीडकर नागरिकांच्या सोयीसाठी डॉ. अमित भराडिया यांची हृदयरोग तपासणी व मार्गदर्शन सेवा दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहणार आहे.

बीड शहरासह परिसरातील नागरिकांनी आज दि. ६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या विशेष हृदयरोग तपासणी शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन सकल जैन समाज, बीड व जैन सोशल फेडरेशन, अहमदनगर संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नोंदणी व अधिक माहितीसाठी : ८२६२००९०९१

सकल जैन समाज, बीड
जैन सोशल फेडरेशन, अहमदनगर संचलित
आनंदऋषीजी 

Back to top button