📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती सारोळा यांच्या वतीने सारोळा प्रशालेस गोष्टीची पुस्तके व लेझीम भेट..!

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती सारोळा यांच्या वतीने सारोळा प्रशालेस गोष्टीची पुस्तके व लेझीम भेट..!

जामखेड (प्रतिनिधी):गुरुवार, दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी सारोळा गावात सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती सारोळा यांच्यावतीने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.सदर उत्सवात सारोळा प्रशालेतील लेझिम पथकाने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.यामुळे सदर कार्यक्रम भव्यदिव्य स्वरूपात सुंदररित्या संपन्न झाला.या कार्यक्रमास ग्रामस्थांची अलोट गर्दी पहावयास मिळाली.
सदर कार्यक्रमातून बचत झालेल्या रकमेतून सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती मधील शिवप्रेमींनी सारोळा प्रशालेतील विद्यार्थांकरिता एकूण 2000/- रुपये किंमतीचे वीस लेझीम संच भेट दिले.तसेच जिल्हा परिषद अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय श्री. आनंद भंडारी साहेब यांच्या संकल्पनेतून सध्या सुरू असलेल्या कुसुमाग्रज वाचन अभियान अंतर्गत सारोळा प्रशालेतील बालवाचनालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर आधारित पुस्तके खरेदीसाठी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती यांच्या वतीने दोन हजार शंभर (2100/- ) रुपयांची देणगी दिली. यावेळी सारोळा प्रशालेच्या वतीने देणगीदारांचे आभार व्यक्त करण्यात आले.
सदर कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य किरण मुळे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जगदाळे, संभाजी मुळे सर,मदन मुळे, सूरज बोलभट, मल्हारी सगळे, अथर्व काशिद व सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे सर्व युवा कार्यकर्ते तसेच सारोळा प्रशालेचे मुख्याध्यापक माजीद शेख, पदवीधर शिक्षक सुरेश बर्वे ,राहुल लिमकर, उपाध्यापक प्रशांत होळकर सर, उपाध्यापिका शबाना शेख ,वृषाली खांदवे व अमृता रसाळ व सर्व विद्यार्थी उपस्थित होते…!

Back to top button