बीड
लिंबागणेश येथे शिवजयंती निमित्त क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले लिखित ” तृतीय रत्न” महानाट्य सादर. ; डीजेमुक्त शिवजयंती साजरी

——-
लिंबागणेश:- ( दि.२६ ) बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे रयतेचे राजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव निमित्त रविवार आणि सोमवार असे दोन दिवशीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मागील ३ वर्षांपासून लिंबागणेश येथे डीजे मुक्त तसेच सांस्कृतिक कार्यक्रमातुन शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येतो. रविवारी ( दि.२३ फेब्रुवारी) रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले लिखित “तृतीय रत्न” महानाटकाचे आयोजन करण्यात आले होते. लिंबागणेशचे भुमिपुत्र प्रा. लेनाजी गायकवाड यांच्या संकल्पनेतून भालचंद्र विद्यालयातील ८-९ वी च्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी नाटक सादर केले या नाटकास ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. दुसऱ्या दिवशी सोमवार दि.२४ रोजी सायंकाळी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. सजवलेल्या रथातून छत्रपती शिवरायांची प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली विशेष आकर्षण म्हणून संगमेश्वर हलगी पथक कुर्ला बीड, तसेच खालसा स्पोर्ट अकॅडमी पाटोदा यांची चित्तथरारक प्रात्यक्षिके आणि लिंबागणेश येथील भालचंद्र विद्यालयातील ढोल पथक आणि लेझीम पथकाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.यासाठी शाळेचे शिक्षक सचिन वाणी यांनी विशेष परिश्रम घेतले. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आपले योगदान दिले. शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.