बीड
जामखेड–सौताडा रस्त्यावर कोळशाचा ट्रक पलटी; एक जखमी, वाहतूक कोंडी

जामखेड–सौताडा रस्त्यावर कोळशाचा ट्रक पलटी; एक जखमी, वाहतूक कोंडी
जामखेड प्रतिनिधी :
जामखेड–सौताडा रस्त्यावर मोहा फाटा येथे दगडी कोळशाने भरलेला ट्रक पलटी झाल्याने एक जण जखमी झाला. ट्रकसह रस्त्यावर कोळसा सांडल्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
अपघाताची माहिती मिळताच एका सामाजिक कार्यकर्त्यांनी तात्काळ रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवून जखमींना मदत केली. जखमी व्यक्ती मोटरसायकलवरून जात असताना ट्रक पलटी झाल्याने हा अपघात घडल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षकांनी तात्काळ पोलिस कर्मचारी घटनास्थळी पाठवून परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच स्थानिक नागरिकांनीही मदतकार्य केले.
दरम्यान, रस्त्यावर पडलेला कोळसा व पलटी झालेला ट्रक क्रेन व जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करण्यात आल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.



