बीड
शांतीब्रम्ह नवनाथ बाबा यांची बक्करवाडी भव्य मिरवणूक

शांतीब्रम्ह नवनाथ बाबा यांची बक्करवाडी भव्य मिरवणूक
बीड, मौजवाडी फाटा,ढेकाणमोह, टेकडी फाटा, येथे स्वागत
बीड (प्रतिनिधी) श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी मठाधिपती महंत गुरुवर्य शांतीब्रम्ह नवनाथ बाबा महाराज यांची दोन धाम यात्रा रामटेक नागपूर, मैहर शरद देवी, प्रयागराज, वाराणशी (काशी) गोरखपुर, पशुपतिनाथ नेपाळ,मनोकामनादेवी नेपाळ, चंद्रगिरी नेपाळ, भोलेश्वार नेपाळ, अयोध्या, चित्रकूट, मंदाकिनी नदी आरती, उज्जैन महाकालेश्वर, काळभैरव, ओंकारेश्वर, मुक्ताई नगर, बीड असा दोनधाम यात्रा प्रवास
पूर्ण झाल्यावर मंगळवारी बीड येथे आगमन झाले. शांतीब्रह्म नवनाथ बाबा महाराज यांचे बीड मध्ये भव्य स्वागत करण्यात आले. बक्करवाडी ग्रामस्थांच्या वतीने ढोल ताशा लेझीम वाजवत गावातील लहान, थोर, महिला व पुरुष मंडळींनी बक्करवाडी फाटा ते बक्करवाडी येथे रथा मधून भव्य मिरवणूक गुरुवर्य शांती ब्रह्मा नवनाथ बाबा महाराज यांचे दोन धाम यात्रा पूर्ण झाल्याबद्दल काढण्यात आली. तसेच संपूर्ण गावामध्ये महाप्रसादाची पंगत आयोजन करण्यात आले.
मौजवाडी फाटा येथे मौजवाडी ग्रामस्थांच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आला. ढेकणमोहा ग्रामस्थांच्या वतीने ढेकणमोहा येथे स्वागत करण्यात आले. श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथील भाविक भक्तांनी गोरक्षनाथ टेकडी फाटा परिसरात फटाके फोडत बाबांचे भव्य स्वागत करण्यात आले.
बीडच्या वेशात खांडे व लांडे कुटुंबाकडून हॉटेल सनराइज् येथे स्वागत समारंभ घेण्यात आला. बीड येथे नवनाथ बाबा समवेत दोन धाम यात्रा करणाऱ्या घुमरे कुटुंबाकडून स्वागत करण्यात आले.
चौकट:- गुरुवर्य शांतीब्रम्ह नवनाथ बाबा महाराज यांच्या 15 दिवसाच्या दोन धाम यात्रा मध्ये रमेश घुमरे यांच्या कुटुंबाने बाबाची खूप सेवा करण्यात आली



