बीड

उद्योजकता विकास या विषयावर वाणिज्य विभागाकडून ऑनलाईन वेबिनार

उद्योजकता विकास या विषयावर वाणिज्य विभागाकडून ऑनलाईन वेबिनार
परळी : येथील नवगण महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या वतीने “उद्योजकता विकास” या महत्त्वपूर्ण विषयावर ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले. या वेबिनारसाठी सरस्वती भवन महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील प्रा. डॉ. दिलीप चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आबासाहेब हांगे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.
मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. दिलीप चव्हाण यांनी विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची मानसिकता निर्माण होणे आजच्या काळाची गरज असून नव्या पिढीने नोकरीपुरते मर्यादित न राहता उद्योग, स्टार्टअप आणि स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करावी, असे प्रतिपादन केले. उद्योजकतेसाठी आवश्यक कौशल्ये, संधी, आव्हाने तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. आबासाहेब हांगे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा शैक्षणिक उपक्रमांचे महत्त्व विशद केले. तसेच महाविद्यालय भविष्यातही उपयुक्त व मार्गदर्शक कार्यक्रमांचे आयोजन करणार असल्याचे सांगितले.
या वेबिनारला उपप्राचार्य डॉ. लालासाहेब घुमरे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने ऑनलाईन उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. अनुरथ चंद्रे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. फुलारी यांनी केले. वेबिनार यशस्वी झाल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
Back to top button