बीड

महामार्गावरील आरोपींना धाडसाने पकडल्या बद्दल मनोज परजणे दै. सिटीजन व मातृभूमी कडून सन्मानित.   

महामार्गावरील आरोपींना धाडसाने पकडल्या बद्दल मनोज परजणे दै. सिटीजन व मातृभूमी कडून सन्मानित.
बीड (प्रतिनिधी ) : राज्य महामार्ग क्रमांक 52 धुळे ते सोलापूर दरम्यान बीड जिल्ह्यातील पोलीस ठाणे गेवराई,बीड ग्रामीण व नेकनूर या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जबरी चोरी करणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार मनोज श्रीमंत परजणे यांनी दि.12 डिसेंबर 2025 रोजी गोपनीय मातीचा अचूक वापर, तांत्रिक साधनांचा प्रभावी उपयोग करून  अत्यंत शिताफीतेने धाडसाने व कौशल्यपूर्ण नियोजन करून  तत्परतेने कारवाई करून तीन आरोपींना पकडल्या बद्दल पोलीस अध्यक्ष नवनीत काॅंवत यांच्यावतीने राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते मनोज परजणे यांचा सन्मानपत्र देऊन दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी 77 वा प्रजासत्ताक दिनी जिल्हा पोलीस मुख्यालय कवायत मैदानावर त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या या धाडसी कार्याबद्दल दै. सिटीजन व मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा संपादक मुजीब शेख व प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय तांदळे यांनी सत्कार केला. यावेळी नगरपरिषदेच्या अध्यक्षा प्रतिभा पारवे उपनगराध्यक्ष विनोद मुळूक आदींची उपस्थिती होती.
Back to top button