अंबाजोगाईत भाजपला धक्का; माजी नगरसेवक नागनाथ जोगदंड यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

अंबाजोगाईत भाजपला धक्का; माजी नगरसेवक नागनाथ जोगदंड यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश
*अंबाजोगाई (प्रतिनिधी)-अंबाजोगाईतील प्रभाग क्रमांक 4 चे माजी नगरसेवक नागनाथ आप्पा जोगदंड यांनी तालुकाध्यक्ष अभिजीत लोमटे व शहराध्यक्ष असे उद्दीन बाबा खतीब यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षा मध्ये जाहीर प्रवेश केला.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,माजी मंत्री अशोकराव पाटील खासदार रजनीताई पाटील व जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांचे हात बळकट करण्यासाठी तालुकाध्यक्ष अभिजीत लोमटे व शहराध्यक्ष असेफोद्दीन बाबा खतीब यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक नागनाथ जोगदंड यांच्यासह प्रकाश जोगदंड शिवाजी जोगदंड नवनाथ जोगदंड यांनी काँग्रेस पक्ष प्रवेश केला असून भाजपा नेते मुंदडाचे राजकारण हे चाल बंद खोलीतील असून सर्वसामान्य वंचित गोरगरिबांच्या नेत्यांना मुंदडा विचारात घेत नाही ते फक्त निवडणुकीपुरता वापर करतात याच मुळे भाजप पक्षाला सोडचिट्टी देत काँग्रेसमध्ये आज जाहीर प्रवेश केला आहे आगामी काळात होणाऱ्या नगरपरिषद निवडणूक जिंकून अंबाजोगाई नगरपरिषद सर्व सामान्य जनतेचा पक्ष असलेला काँग्रेस पक्षाच्या ताब्यात घेऊ असे मत पक्षप्रवेशानंतर माजी नगरसेवक नागनाथ आप्पा जोगदंड यांनी व्यक्त केले.



