
बाळेवाडी गावामध्ये कृषीदूतांचे उत्साहात स्वागत
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील बाळेवाडी येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी संलग्न श्री. छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालय, आष्टी येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांचे ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत आगमन झाले. यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ व शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत कृषीदूतांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
यामध्ये कृषीदूत सागर सुळे, मयूर सांगळे, लोकेश भिसे, पवन आमटे, आकाश बाहिर, महेश वीर, तुषार मधने व ऋषिकेश सांगळे यांचा समावेश आहे. कृषीदूतांनी गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधून आधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, मृदा परीक्षण, जैविक शेती, पीक संरक्षण तसेच शासकीय कृषी योजनांविषयी मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर. आरसुळ सर, कृषी कार्यानुभव कार्यक्रम समन्वयक प्रा. रोहिणी शिंदे मॅडम तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा. पी. आर. काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम २०२६-२७ अंतर्गत कृषीदूत गावामध्ये विविध कृषी प्रात्यक्षिके, शेतकरी मेळावे, मृदा नमुना संकलन, पीक सल्ला व जनजागृती उपक्रम राबविणार आहेत.
यावेळी गावाच्या सरपंच लता रंगनाथ बर्डे, उपसरपंच बापू निवृत्ती पठारे, सदस्य नवनाथ यमाजी शेलार, तसेच बापू किसन काळे, नानुबाई भगवान गव्हाने, ज्योती अशोक गाडे, शिला अशोक पठारे दादासाहेब पठारे (आर्टिस्ट) यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृषीदूतांच्या आगमनामुळे शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळण्यास मदत होणार असून शेती अधिक उत्पादनक्षम व शाश्वत करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.
“ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञान पोहोचवून शेती अधिक उत्पादनक्षम व शाश्वत बनविणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.”



