बीड
खडतर काळात टिकायचे असेल तर धर्मकार्य शिवाय पर्याय नाही – भक्तिदास महाराज घोडके

खडतर काळात टिकायचे असेल तर धर्मकार्य शिवाय पर्याय नाही – भक्तिदास महाराज घोडके
राधाकृष्णनगरी येथील हरिनाम सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशीच्या आपल्या कीर्तनात भक्ती दास महाराज घोडके यांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग घेत असताना ईश्वरा प्रति निस्वार्थ भावना केलेली भक्ती हाच खरा जीवनाचा पाया खडतर काळात उमेदीने यश मिळवण्यासाठी मनातून धर्मकार्य केलं पाहिजे म्हणून त्यांनी पुढील अभंगासह आपल्या कीर्तनातून प्रबोधन केले
वीर विठ्ठलाचे गाढे, कळिकाळ पायां पडे…”
या अभंगातून विठ्ठल भक्तांची महती संत तुकाराम महाराज अतिशय सुंदर रीतीने सांगतात.
ज्या भक्तांच्या मनामध्ये विठ्ठलावर अखंड श्रद्धा आणि प्रेम असते, ते खऱ्या अर्थाने ‘वीर’ असतात. कारण ते संसारातील मोह, माया, वाईट प्रवृत्ती आणि कळिकाळावर विजय मिळवतात. त्यामुळेच कळिकाळही त्यांच्या चरणी नतमस्तक होतो.
“करिती घोष जयजयकार, जळती दोषांचे डोंगर…”
जेव्हा भक्त नामस्मरण करतो, भजन-कीर्तन करतो, तेव्हा त्याच्या जीवनातील पाप, दोष, दुर्गुण हे जणू काही जळून भस्म होतात. नामाचा जयजयकार म्हणजे आत्मशुद्धीचा मार्ग आहे.
“क्षमा, दया, शांती – बाण अभंग हे हाती…”
भक्ताच्या हातात कोणते शस्त्र असते? तर क्षमा, दया आणि शांती हीच त्याची खरी शक्ती आहे. हे गुण ज्याच्या जीवनात आहेत, तोच खरा विठ्ठलभक्त.
“तुका म्हणे बळी, तेचि एक भू मंडळी…”
तुकाराम महाराज म्हणतात – या पृथ्वीवर खरे सामर्थ्यवान, खरे श्रेष्ठ कोण आहेत? तर हेच विठ्ठलाचे भक्त! यावेळी राधाकृष्णनगरी जिजाऊ सृष्टी रेणुका नगरी सह परिसरातील हजारो माता माउल्या व भक्तगण कीर्तनासाठी उपस्थित होते


