बीड

जिल्हा परिषद प्राथमिक तपनेश्वर शाळेत शाहीर तुकाराम काळे यांचे प्रबोधन

  • जिल्हा परिषद प्राथमिक तपनेश्वर शाळेत शाहीर तुकाराम काळे यांचे प्रबोधन

मोबाईल वापर टाळण्याचे शाहीर काळे यांचे आवाहन

जामखेड प्रतिनिधी : आष्टी तालुक्यातील प्रसिद्ध शाहीर तुकाराम काळे यांच्या प्रभावी प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणिवा निर्माण व्हाव्यात आणि योग्य मूल्यांची जडणघडण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमात शाहीर काळे यांनी आपल्या ओजस्वी वाणीमधून अंधश्रद्धा निर्मूलन, राष्ट्रीय एकात्मता, सर्व शिक्षण अभियान, संपूर्ण स्वच्छता मोहीम तसेच ‘कॉपीमुक्त शाळा’ या संकल्पनांवर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिरेक टाळून अभ्यास, क्रीडा आणि संस्कार यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या शाहिरी शैलीतील सादरीकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनराज पवार, मुख्याध्यापक प्रताप पवार, उपाध्यापिका मंगल सोलंकर, शितल कदम, रूपाली कांबळे, कल्पना मोरे,स्वाती गोरे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी शाहीर तुकाराम काळे यांचा शाळा व्यवस्थापन समिती च्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षिका शितल कदम यांनी शाहीर काळे यांचे आभार मानले.

Back to top button