बीड

जामखेड शहरात धर्मवीर ज्वालेचे पूजन; शहरातून भव्य दर्शन यात्रा

जामखेड शहरात धर्मवीर ज्वालेचे पूजन; शहरातून भव्य दर्शन यात्रा

जामखेड | प्रतिनिधी :
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथून धर्मवीर ज्वाला जामखेड येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही आणण्यात आली. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे संस्थापक श्र. संभाजीराव भिडे यांच्या प्रेरणेने देशभर धर्मवीर ज्वाला नेण्याची परंपरा सुरू असून त्याच परंपरेनुसार जामखेडमध्ये ही धर्मवीर ज्वाला आणली जाते.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आष्टी,जामखेड व जगदंब प्रतिष्ठान यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार, दि. १४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी वढू बुद्रुक येथून निघालेली धर्मवीर ज्वाला रविवारी (दि. १५ मार्च) सकाळी ११ वाजता जामखेड शहरात दाखल झाली. शहरातील खर्डा चौक येथे बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले आणि विश्व हिंदू परिषदेचे विवेक कुलकर्णी यांच्या हस्ते ज्वालेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर लक्ष्मी चौकातील रुद्रा पेंट्स येथे भाजप शहर मंडल अध्यक्ष तथा नगरसेवक संजय काशिद यांनीही ज्वालेचे पूजन केले.
यावेळी जामखेड नगरपरिषदेचे बांधकाम समिती सभापती तथा नगरसेवक मोहन पवार, दादा अंदुरे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी बबलू टेकाळे, अमोल निमोणकर, राजेंद्र भांबे, रविराज क्षिरसागर, बजरंग दलचे दिगंबर राळेभात, वैभव कार्ले, विजय गौड, डॉ. महेश मासाळ, संदीप आण्णा गायकवाड, रणजित सुराणा, दीपक ददियाल, रमेश क्षिरसागर, दीपक सुरसे, बाळू जावळे, प्रदीप बहीर, योगेश औचरे, कृष्णा बुरांडे यांच्यासह अनेक शिवप्रेमी उपस्थित होते.
धर्मवीर ज्वालेचे स्वागत झाल्यानंतर शहरातील मुख्य बाजारपेठेतून भव्य दर्शन यात्रा काढण्यात आली. ही यात्रा जय हिंद चौक, छत्रपती शिवाजी महाराज पेठ आणि संविधान चौक मार्गे खंडोबा वस्ती येथील श्री शंभूसूर्य मर्दानी आखाडा येथे पोहोचली. तेथे धर्मवीर ज्वालेचे विधीपूर्वक पूजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ संपूर्ण महिनाभर ‘बलिदान मास’ पाळला जातो. या कालावधीत शिवभक्त विविध धार्मिक विधी करतात तसेच काहीजण संकल्प करून काही पदार्थ किंवा वस्तू वर्ज्य करतात. बलिदान मासाच्या शेवटच्या दिवशी अनेक ठिकाणी मुक पदयात्रा काढली जाते.

Back to top button