बीड

मिल्लीया महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कामखेडा येथे आरोग्य तपासणी शिबिर

मिल्लीया महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कामखेडा येथे आरोग्य तपासणी शिबिर

बीड: मिल्लीया कला, विज्ञान व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद इलयास फाजील यांच्या मार्गदर्शनात मौजे कामखेडा ता. बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबिरामध्ये सोमवार दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिराचे उद्दिष्ट अ‍ॅनिमियाविषयी जागरूकता निर्माण करणे, त्याची लक्षणे आणि प्रतिबंध याबाबत माहिती देणे तसेच सहभागींची तात्काळ तपासणी व सल्ला देणे होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन कामखेडा येथील सरपंच प्रतिनिधी श्री.अमीर पटेल कामखेडा हायस्कूल कामखेडाचे मुख्याध्यापक श्री.राजेंद्र कुऱ्हे यांच्या हस्ते संपन्न झाले. श्री. अमीर पटेल यांनी अ‍ॅनिमियाचा आरोग्यावर होणारा परिणाम, विशेषतः महिलांमध्ये आणि किशोरवयीन मुलां-मुलींमध्ये मध्ये, यावर प्रकाश टाकला. तसेच गावातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे संबोधित केले. हे शिबीर प्राथमिक आरोग्य केंद्र साक्षाळपिंप्री च्या सहकार्याने आयोजित केले होते. डॉ. बोराडे अर्चना श्री. बेग राजू (आरोग्य सेवक), सौ. बहिर सोनाली (आरोग्य सेविका), श्री. सातपुते कृष्णा (आरोग्य सेवक), सौ. खोड मंदोदरी ( गट प्रवर्तक) सौ. मस्के शालिनी ( आशा वर्कर ), सौ. केशर वाघमारे ( आशा वर्कर ), कामखेडा येथील समाजसेवक जबाब सलीम भाई आणि रा. से. यो. स्वयंसेवकांची टीम शिबिर यशस्वी करण्यासाठी अथक प्रयत्न करत होती. प्रत्येकाची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली आणि ज्यांना कमी स्तर आढळले त्यांना आहारातील बदल आणि जीवनशैली सुधारण्याबाबत वैयक्तिक सल्ला देण्यात आला. तसेच गरजूंना मोफत लोह व फॉलिक ऍसिड सप्लिमेंट्स देण्यात आले. शिबिरात संतुलित आहार, नियमित आरोग्य तपासण्या, आणि स्वच्छता या विषयांवरही भर देण्यात आला. एनएसएस स्वयंसेवकांनी शिबिराच्या व्यवस्थापनात, सहभागाच्या समन्वयात आणि योग्य मार्गदर्शनात महत्त्वाची भूमिका बजावली. या शिबिराने समाजाच्या आरोग्यासाठी मोठे योगदान मिळाले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रोफेसर रमेश वारे यांनी तर आभार डॉ. शामल जाधव यांनी व्यक्त केले
 शिबिरामध्ये कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक वारे आर, एल प्रा शोएब पिरजादे डॉ शामल जाधव व स्वयंसेवक उपस्थित होते
Back to top button