ज्येष्ठ अनुभवी नरसिंग नाईकवाडेंच्या प्रवेशाने राष्ट्रवादी व उबाठा महाविकास आघाडीचे पारडं जड —राजेंद्र मस्के

शैलेश नाईकवाडे यांना युवक जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी
बीड प्रतिनिधी:बीड नगर परिषदेतील ज्येष्ठ व अनुभवी नगर सेवक तथा सभापती नरसिंग अण्णा नाईकवाडे, त्यांचा मुलगा शैलेश नाईकवाडे यांनी
मा. शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वावर दृढ विश्वास व्यक्त करत आ. संदीपभैया क्षीरसागर,माजी आमदार सय्यद सलीम, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, वैजनाथ नाना तांदळे, अजय नाईकवाडे
तालुका अध्यक्ष बाळासाहेब गोरे,
यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून हाती तुतारी घेतली आहे. पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आले असून शैलेश नाईकवाडे यांन युवक उप जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. नरसिंग
नाईकवाडे यांच्या प्रवेशा मुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पारडं जड झाले.नाईकवाडे यांचा प्रदिर्घ अनुभव व जनसंपर्काचा फायदा
तुतारीच्या विजयासाठी निश्चित होईल.असा विश्वास राजेंद्र मस्के यांनी व्यक्त केला.
गेली 40 वर्षापासून नरसिंग अण्णा नाईकवाडे बीड नगर परिषदेच्या राजकारणात सक्रिय सहभागी असुन सहा वेळा त्यांच्या परिवाराने नगरसेवक व विविध सभापती पदाची जबाबदारी चोखपणे संभाळली आहे.
सर्व जाती धर्माच्या लोकांशी थेट संपर्कात असतात. अल्पसंख्याक समाजात ही त्यांची प्रभावी ओळख आहे. समाजाचा विश्वास आहे.आज ही शहरातील बशीरगंज मधील सालारगंज मशिदीचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. कोणताही जाती धर्माचा भेदा भेद न करता जनसेवा केलेली आहे. सामाजिक समरसता व सौख्य टिकवण्यासाठी अग्रेसर असतात. त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना उबाठा यांच्या महाविकास आघाडीला ताकद मिळणार आहे.



