बीड
MPSC परीक्षेत यश ! वैभव वराट यांच्या सन्मानार्थ मंगेश आजबे यांचा विशेष सत्कार सोहळा

MPSC परीक्षेत यश ! वैभव वराट यांच्या सन्मानार्थ मंगेश आजबे यांचा विशेष सत्कार सोहळा
जामखेड प्रतिनिधी – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत यश संपादन करून पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) या पदावर निवड झालेल्या साकत गावचे सुपुत्र चि. वैभव संजीवनी बळीराम वराट यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंगेश आजबे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बावी सोसायटीचे चेअरमन सुंदरदास बिरंगळ, सूर्यकांत ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी वैभव वराट यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
वैभव वराट यांनी आपल्या यशाचे श्रेय कुटुंबीय, शिक्षक, आणि मित्रपरिवाराला देत, “समर्पण आणि सातत्याने मेहनत केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही”, असे मत मंगेश आजबे यांनी व्यक्त केले.



