बीड

अहिल्यादेवींनी हिंदुत्वाची पताका उंचावली, त्यांच्या कार्याची प्रेरणा आजही मार्गदर्शक – संजय काशिद

अहिल्यादेवींनी हिंदुत्वाची पताका उंचावली, त्यांच्या कार्याची प्रेरणा आजही मार्गदर्शक – संजय काशिद

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त ; जामखेड येथे स्वच्छता मोहीम व महाआरती

जामखेड (प्रतिनिधी):पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी मुघल साम्राज्याच्या काळातही हिंदुत्वाची पताका उंच ठेवत अनेक मंदिरांचे जतन केले. तसेच काम सध्या सभापती प्रा राम शिंदे यांच्या माध्यमातून परिसरात सुरू आहे.पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्याची प्रेरणा घेऊन आपणही जयंती दिनी ३१ मे रोजी चौंडी येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा शहरमंडल अध्यक्ष संजय (काका) काशिद यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त देशभर राबवण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहिमेचा भाग म्हणून, आज दिनांक २४ मे २०२५ रोजी भाजपा शहर जामखेड यांच्या वतीने ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिर परिसर व धाकटी नदी परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.यावेळी ते बोलत होते.

श्री नागेश्वर मंदिर येथे जेष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात यांच्या हस्ते व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थित महाआरती करण्यात आली.

यावेळी बोलताना जेष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात म्हणाले की,श्री क्षेत्र चौंडी हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान आहे आणि आपलाही जन्म याच जामखेड तालुक्यात झाला, हे आपले भाग्य आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी संपूर्ण देशात नदी घाट आणि मंदिरे यांचे जतन आणि जिर्णोद्धाराचे कार्य केले. त्याच प्रेरणेतून सभापती प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून श्री नागेश्वर मंदिर परिसराच्या विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. येत्या काळात नदी सुशोभीकरणासाठीही अधिक निधी मिळवला जाईल.

यावेळी ग्रामीण मंडलअध्यक्ष बापुराव ढवळे, सरपंच संगिता पारे यांनी मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी जेष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात,भाजपा ग्रामीण मंडलअध्यक्ष बापुराव ढवळे, शहर मंडल अध्यक्ष संजय (काका) काशिद, प्रविण चोरडिया, मनोज कुलकर्णी,माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, नगरसेवक दिगांबर चव्हाण, पवन राळेभात, मोहन (मामा) गडदे, सुनील यादव, उध्दव हुलगुंडे , डॉ.विठ्ठल राळेभात,अभिजीत राळेभात, प्रा.जाकीर शेख,बाळासाहेब गायकवाड,प्रविण होळकर, आण्णा ढवळे,वकील संजय पारे, सरपंच संगिता पारे, राहुल चोरगे, रंगनाथ राजगुरू, संदीप ठोंबरे, उमेश कांबळे, संदीप भंडारी, आण्णा विटकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button