बीड

उपमुख्यमंञी ना.अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी-काँग्रेस पार्टीत शिवसंग्रामचे पांडुरंग आवारे-पाटील यांनी केला जाहीर प्रवेश

उपमुख्यमंञी ना.अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी-काँग्रेस पार्टीत शिवसंग्रामचे पांडुरंग आवारे-पाटील यांनी केला जाहीर प्रवेश
*स्व.विनायकरावजी मेटे साहेबांचा शिवसंग्राम पक्षाचा सच्चा मावळा ना.अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी परीवारात दाखल*
<————————————–>
*बीड (प्रतिनिधी)* दि.21 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी-काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना.अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत बीडचे मा. नगराध्यक्ष, मा.जि.प.सदस्य श्री.दिलीप आण्णा गोरे यांचा व शिवसंग्राम संपर्कप्रमुख पिंपरी-चिंचवड शहर,पुणे. श्री.पांडुरंग आवारे-पाटील, बीड प स मा.उपसभापती श्री.संजय गव्हाणे, मा. प स सदस्य फिरोज पठाण व अन्य सहकार्यांनी राष्ट्रवादी-काँग्रेस पार्टी मुख्य कार्यालय मुंबई येथे पक्ष प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशामुळे होवु घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणुकीत नक्कीच राष्ट्रवादी-काँग्रेस पार्टीला शहरी व ग्रामीण भागांत फायदा होणार आहे व भविष्यात राष्ट्रवादी-काँग्रेस पार्टीला पक्ष वाढीसाठी बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात निश्चितपणे फायदा होणार आहे अशी माहीती राष्ट्रवादी-काँग्रेस पार्टीत प्रवेश केलेले व मराठा सेवक म्हणून काम करत असलेले श्री.पांडुरंग आवारे-पाटील यांनी दिली आहे.
   बालाघाटाचे नेते म्हणून परिचित असणारे पांडुरंग आवारे-पाटील हे गेल्या 11 वर्षांपासून लोकनेते स्व.विनायकरावजी मेटे साहेब यांच्या सोबत तन-मनधनाने व एकनिष्ठने शिवसंग्राम संघटना वाढविण्याचे काम महाराष्ट्र राज्यांत आवारेंनी केले आहे व करत होते, तसेच संघर्ष योद्धा मा.श्री.मनोज जरांगे-पाटील यांनी उभा केलेल्या मराठा आरक्षणाच्या चळवळीतील लढ्यांत सुरवाती पासुन अग्रेसर सक्रीयपणे मराठा सेवक म्हणून सोबत अविरत पणे काम करत आहेत. महाराष्ट्राला विकासात्मक दुरद्रुष्टी कानाकोपऱ्यात पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील असणारे व राज्यातील सर्व घटकांतील लोकांना सोबत पुढे घेऊन जाणारे व सर्व समभाव ह्या हेतूने न्याय देणारे राज्याचे उपमुख्यमंञी मा.ना.अजित दादा पवार यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंञी म्हणून पालकत्व हाती घेतल्यामुळे नक्कीच
गेल्या अनेक वर्षांपासून बीड जिल्हा विकासकामांपासून वंचित होता त्या बीड शहराचा- जिल्ह्याचा विकास करण्यासाठी जातीने लक्ष घालुन त्या भावनेने विकासात्मक कामे करत आहेत म्हणून ना.अजित दादा पवार यांना साथ व सोबत देण्यासाठी राष्ट्रवादी-काँग्रेस पार्टीत पक्ष प्रवेश मराठा सेवक पांडुरंग आवारे-पाटील यांनी केला आहे.
  पांडुरंग आवारे-पाटील हे चळवळीतून तयार झालेले नेतृत्व आहे व विस्थापित कुटुंबातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचे सुपुत्र असून त्यांनी सामाजिक प्रश्नांवर अनेक आंदोलनं-उपोषणे केलेले आहेत व सहभाग नोंदवला आहे ते सामाजिक प्रश्नांवर अग्रेसर असतात त्यांचा बीड जिल्ह्य़ात व राज्यात दांडगा चांगला जनसंपर्क आहे व पांडुरंग आवारेंनी राजकारणाच्या सुरवाती पासुन मागील काळात राष्ट्रवादी-काँग्रेस पार्टीचेच ना.अजित दादा पवार यांचा कार्यकर्ता म्हणून काम केलेले आहे.
पांडुरंग आवारेंचा राष्ट्रवादी-काँग्रेस पार्टीचे व  बीड जिल्ह्यातील व राज्यातील आनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आणि त्यांचा मराठवाड्यातील पिंपरी-चिंचवड शहरात व पुणे शहर परीसरात स्थलांतरीत झालेल्या नागरिकांशी/ बांधवाशी चांगला संपर्क व नाळ जुठलेली आणि जनसंपर्क चांगला आहे,पांडुरंग आवारे-पाटील हे चौसाळा जि.प गटातुन सर्व साधारण खुल्या प्रवर्गातून निवडणुक लढविण्यासाठी ईच्छुक आहेत. आज ते समाजकार्यच्या व राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आल्यामुळे ना.अजित दादा पवार यांचे नेतृत्व स्वीकारून त्यांनी बीडचे मा.नगराध्यक्ष श्री.दिलीप आण्णा गोरे यांच्या समवेत राष्ट्रवादी-काँग्रेस पार्टीत पक्ष प्रवेश केला आहे त्यांचे ना.अजित दादा पवार यांनी राष्ट्रवादी-काँग्रेस पार्टीत स्वागत करून अभिनंदन केले व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Back to top button