बीड
मंत्री रामदास आठवले यांच्या विराट सभेला दिव्यांग बांधवांनी उपस्थित रहावे : प्रदेशाध्यक्ष सुरेश माने

मंत्री रामदास आठवले यांच्या विराट सभेला दिव्यांग बांधवांनी उपस्थित रहावे : प्रदेशाध्यक्ष सुरेश माने
बीड प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची बीड शहरात शुक्रवार १६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज चौक बीड येथे युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा रिपाइंचे बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्याची शासन दरबारी पूर्तता करण्यासाठी विराट जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला बीड जिल्ह्यातील दिव्यंग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रिपाइं दिव्यंग आघाडी प्रदेशाध्यक्ष सुरेश धर्मराज माने यांनी केले आहे.
राज्यासह मराठवाड्यात व बीड जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. दुष्काळामुळे जनावरांच्या चाऱ्याचा पाण्याचा व मोल मजुरांच्या पोटापाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पावसाअभावी राज्यभर दुष्काळ जाहीर झाला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १ लाख रुपये मदत देण्यात यावी. शेतमजूर, कामगार व मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या कुटुंबियांना ५० हजार रुपये मदत जाहीर करण्यात यावी. यासह समाज बांधवांच्या विविध मागण्या आणि दिव्यांग महामंडळाकडून देण्यात आलेले सर्व थकीत कर्ज पूर्णतः माफ करण्यात यावे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दिव्यांगांसाठी राखीव असणारा ५ टक्के निधी दिव्यांगांना नियमितपणे वितरित करण्यात यावा. सुशिक्षित बेरोजगार दिव्यांग बांधवाना रोजगारासाठी शासन निर्णयानुसार २०० चौ.मी. जागा व्यवसायासाठी उपलब्ध करून देण्यात यावी., दिव्यांग पेन्शन योजनेत भरीव वाढ करण्यात यावी., दिव्यांगांना घरकुलाचे वितरण प्राधान्याने करण्यात यावे. आदी मागण्याची पूर्तता करण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड शहरात १६ ऑक्टोबर शुक्रवार रोजी होणाऱ्या
विराट जाहीर सभेस बीड जिल्ह्यातील दिव्यंग बांधवांसह सर्व समाजातील समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रिपाइं दिव्यंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुरेश कौशल्या धर्मराज माने यांनी केले आहे.



