बीड
डि.वाय.एस.पी किरण खाडे यांची आनंदवाडी शाळेला सदिच्छा भेट

डि.वाय.एस.पी किरण खाडे यांची आनंदवाडी शाळेला सदिच्छा भेट
जामखेड – मुलांनो, स्पर्धेला घाबरू नका. मेहनत, नियमित अभ्यास आणि आत्मविश्वास यामुळे मोठ्या पदावर पोहोचता येते” असा संदेश डि.वाय.एस.पी किरण खाडे यांनी आनंदवाडी जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना दिला. “माझी शाळा, माझा अभिमान” या उपक्रमांतर्गत त्यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
विद्यार्थिनी पुनम गीते, अनुष्का, ऋतुजा, सानिका, मोहिनी राख, वैष्णवी, रुपाली, कोमल वनवे यांनी त्यांना प्रश्न विचारले. खाडे यांच्यासोबत त्यांचे बंधू आय.टी. इंजिनिअर प्रवीण खाडे उपस्थित होते. दोन्ही बंधूंनी गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका ज्योती चौधरी, श्रीकृष्ण बोराटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुजित राजू खाडे, ग्रामपंचायत सदस्य व पालक उपस्थित होते.



