जामखेड शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत सर्व्हेक्षण सुरू जामखेड नगर परिषदेकडे निधी असूनही नियोजन शून्य – बजरंग सरडे यांचा आरोप

जामखेड शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत सर्व्हेक्षण सुरू
जामखेड नगर परिषदेकडे निधी असूनही नियोजन शून्य – बजरंग सरडे यांचा आरोप
जामखेड | केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सध्या जामखेड शहरात हगणदारीमुक्त (ODF) सर्वेक्षण सुरू आहे. या मोहिमेत शहरातील स्वच्छतेसह नागरिक उघड्यावर शौचास जात आहेत का, याचीही पाहणी केली जात आहे.
याआधी नगर परिषदेला कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडून प्राप्त झाला असूनही, प्रत्यक्षात शहरातील अनेक भागांत अद्यापही उघड्यावर शौचाची समस्या कायम आहे. विविध वॉर्डांमध्ये स्वच्छतागृहे उपलब्ध नसल्याने किंवा असली तरी ते बंद अवस्थेत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
‘स्वच्छता शून्य, निधी भरपूर’ अशी नागरिकांत नाराजी व्यक्त होत असून, प्रशासनाने निधीचा उपयोग नेमका कुठे केला, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
*कोट*
जामखेड नगर परिषदेला राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळतोय, पण तो नेमका कुठे जातोय हे कोणालाही माहिती नाही. विकासकामांपेक्षा भ्रष्टाचारालाच प्राधान्य दिलं जातंय. जनता कर भरते, पण त्या पैशातून सुविधा मिळत नाहीत. हा निधी कुणाच्या तरी खिशात जातोय की काय, असा प्रश्न निर्माण होतो. प्रशासनाकडून कुठलाही ठोस नियोजन नाही आणि जबाबदारीचं भानही नाही.
*बजरंग सरडे*
आम आदमी पार्टीचे, जिल्हा संघटन , अहिल्यानगर



