वनविभागाला दैनिकात बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतरच कोरडेठाक पाणवठ्यात पाणी सोडण्यासाठी जाग येते का?? पाणवठ्याच्या दर्जेदार दुरूस्तीची आवश्यकता :- डॉ.गणेश ढवळे

—–
लिंबागणेश:-( दि.२२ )ऐन उन्हाळ्यात पाण्याअभावी वन्यजीवांचे हाल सुरू असल्याचे गंभीर चित्र पहायला मिळते.वनविभागाकडून वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.दिवसेंदिवस उन्हाचा पारा चढत असुन वन्यप्राण्यांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरूच असुन त्यांची होणारी ससेहोलपट पाहता वनविभागाने बांधलेल्या कृत्रिम पाणवठ्यात नियमितपणे पाणी सोडावे हि वन्यप्रेमींची अपेक्षा असते. मात्र वनविभागाला याचे गांभीर्य नसुन सामाजिक कार्यकर्ते यांनी तक्रार केल्यानंतर आणि याबाबत विविध दैनिकात बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतरच वनविभागाला जाग येते आणि दुस-या दिवशी कोरड्याठाक पाणवठ्यात पाणी सोडले जाते. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात सामाजिक कार्यकर्ते यांच्या तक्रारी व दैनिकात बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतरच जाग येते का?? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केला आहे.
सविस्तर माहितीस्तव
—
बीड तालुक्यातील करचुंडी वनक्षेत्रांतर्गत बेलगाव,पिंपरनई, फुकेवाडी,सोमनाथवाडी लगत असलेल्या वनक्षेत्रात हरिण,मोर, लांडोर,वानर आदि वन्यजीव वास्तव्य करतात.वनक्षेत्रातील कृत्रिम पाणवठे कोरडेठाक पडल्याने तहानलेले वन्यजीव मानवी वस्ती कडे धाव घेत असल्याचे चित्र दिसून येते.काही ठिकाणी कृत्रिम पाणवठे कोरडेठाक तर काही ठिकाणी महिनाभरापूर्वी सोडलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात शेवाळ साचल्याने पाणी पिण्यास योग्य नाही. त्यामुळे वनविभागाने कृत्रिम पाणवठ्यात नियमित पाणीपुरवठा करून शेवाळ साचलेल्या ठिकाणी स्वच्छता करून पिण्यायोग्य पाणी वनविभागाने उपलब्ध करून द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी २ दिवसांपूर्वी केली होती.याविषयी विविध दैनिकात बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानंतर वनविभागाला जाग आली आणि त्यांनी पाणवठ्यात पाणी सोडले.साचलेल्या शेवाळाची साफसफाई केली.
पाणवठ्याच्या दुरूस्तीची गरज, तडे गेलेल्या पाणवठ्यात पाणी टीकत नाही :- डॉ.गणैश ढवळे
—
वन विभागामार्फत बांधण्यात आलेल्या कृत्रिम पाणवठ्यांची उन्हाळ्यापुर्वी देखभाल आणि आवश्यक त्याठिकाणी दुरूस्ती करण्याची आवश्यकता आहे. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष असुन भेगा पडलेल्या,तडे गेलेल्या पाणवठ्याण पाणी टीकुन रहात नाही.वनविभाग वरून सिमेंट आणि वाळुच्या साह्याने भेगा बुजविण्याचा थातुरमातुर प्रयत्न करताना दिसत आहे.मात्र याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही.त्यामुळे पाणवठा दुरूस्तीची कामे दर्जेदार करण्यात यावीत अशी मागणी डॉ.गणेश ढवळे यांनी केली आहे



