भारतीय संविधान दिन डॉ. बाबासाहेब आबेडकर विद्यालयामध्ये उत्साहात संपन्न !

बीड (प्रतिनिधी):- येथील आनंद मागासवर्गीय शिक्षण प्रसारक मंडळ बीड संचलित डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालयामध्ये भारतीय संविधान दिन या विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.ए. हावळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी शिक्षक विजय देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध उपक्रमांच्या आयोजन करण्यात आले, आणि या उपक्रमातील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या संविधान दिनाच्या आयोजित उपक्रमामध्ये वकृत्व स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि शालेय परिसरातून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी यांचा समावेश होता. याप्रसंगी विजय देशमुख यांनी भारतीय संविधान दिनाचे रचना याविषयी मत प्रतिपादन केले. यावेळी हर्षद कांबळे, रोहित गायकवाड या विद्यार्थ्यांनी गीत गायन आणि कु.आर्या गालफाडे, श्याम घुले, समृद्धी गालफाडे, प्रद्युम्न या विद्यार्थ्यांनी वकृत्व स्पर्धेमध्ये यश संपादन केले.
याप्रसंगी यु.बी. पवळ यांनी संविधानाचे महत्त्व विशद केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष या विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.ए. हावळे यांनी संविधानाचे प्रास्ताविक महत्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख संतोष मेश्राम. प्रास्ताविक यु.बी. मवळ आणि आभार प्रदर्शन डब्ल्यू.एस. वाघमारे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर.बी. घुले, श्रीमती एन.जी.मुंडे यांनी प्रयत्न केले. याप्रसंगी एस.एस. गायकवाड सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.



