जामखेड तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने स्नेहल भोसलेचा सत्कार

जामखेड तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने स्नेहल भोसलेचा सत्कार
जामखेड प्रतिनिधी:-जयपूर, राजस्थान येथे २ डिसेंबर ते ५ डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत जामखेडच्या श्री शंभुसूर्य मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेच्या स्नेहल भोसलेने सुवर्णपदक पटकाविल्याबद्दल जामखेड तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने स्नेहल भोसलेचा सत्कार करण्यात आला.
राजस्थान जयपुर याठिकाणी दिनांक २ डिसेंबर ते ५ डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत जामखेडच्या श्री शंभुसूर्य मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेच्या कु. स्नेहल दत्तात्रय भोसले हिने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून खेळताना आपल्या बहारदार खेळाचे प्रदर्शन करत सांघिक सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. स्नेहलला यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्य प्रशिक्षक श्री संतोष (बबलु वस्ताद) टेकाळे, सहप्रशिक्षक अमोल निमोणकर, अहिल्यानगर जिल्हा मल्लखांब संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच तांत्रिक समितीचे सर्व सदस्य यांनी मोलाचे मार्गदर्शन केले होते.
याच अनुषंगाने स्नेहल भोसलेने सुवर्णपदक पटकाविल्याबद्दल जामखेड तालुका केमिस्ट & ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष तात्यासाहेब बांदल यांच्या पत्नी सौ चिञा तात्या बांदल यांच्या हस्ते स्नेहल भोसलेचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी श्री शंभुसूर्य मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्य प्रशिक्षक श्री संतोष (बबलु वस्ताद) टेकाळे, जामखेड तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष तात्यासाहेब बांदल, अमोल निमोणकर, अभिलाषाताई भोजने, नेहाताई म्हेत्रे, विकास आजबे, संदिप राऊत, अविनाश शिंदे, महेश नरके उपस्थित होते



