बीड
“पवनीत कालव्यात जखमी बाघ! वनविभागाची धडाकेबाज कारवाई – गोरेवाडा उपचारासाठी हलविला”

“पवनीत कालव्यात जखमी बाघ! वनविभागाची धडाकेबाज कारवाई – गोरेवाडा उपचारासाठी हलविला”
दै, सूर्योदय:- निश्चल येनोरकर
भंडारा:- पवनी वनपरिक्षेत्रातील गोसे धरणाच्या उजव्या कालव्यात जखमी बाघ आढळताच भंडारा वनविभागाने क्षणाचाही विलंब न करता राक्षसी चपळाईने मदतीची चाके फिरवली. धानोरी-१ बिटचे बिटरक्षक यांनी दिलेल्या माहितीवरून वनपरिक्षेत्र अधिकारी पवनी यांनी तात्काळ पथकासह धाव घेतली आणि लगेचच उपवनसंरक्षक योगेंद्र सिंह, सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) यांच्यासह NNTR व्याघ्र बचाव दल, RRU–RRT पथके घटनास्थळी दाखल झाली.
राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गठीत समितीच्या देखरेखीत बचाव पथकाने अत्यंत शिताफीने बाघास जेरबंद करून वैद्यकीय तपासणीनंतर उपचारासाठी गोरेवाडा येथे हलविले.
दरम्यान परिसरात मानव–वन्यप्राणी संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून वनकर्मचारी व स्थानिक पोलीस दलाने नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवत प्रभावी जनजागृती मोहीम राबवली.
संपूर्ण कारवाई उपवनसंरक्षक योगेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी वृषाली नागदेवे, पवनी वनकर्मचारी, डॉ. मेघराज तुलावी यांचे NNTR बचाव दल, RRT–PRT पथके यांच्या संयुक्त परिश्रमांतून यशस्वीरीत्या पूर्ण झाली.
वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, गावालगत कोणताही वन्यप्राणी दिसल्यास त्याची माहिती त्वरित हॅलो फॉरेस्ट १९२६ किंवा वनविभाग नियंत्रण कक्ष ०७१८४-२५२२८३येथे द्यावी.



