बीड

नागपूरच्या मदर डेअरीला ना. पंकजाताई मुंडे यांची भेट

नागपूरच्या मदर डेअरीला ना. पंकजाताई मुंडे यांची भेट

*विदर्भ-मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाचा घेतला आढावा*

नागपूर ।दिनांक ०९।
नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डातंर्गत (NDDB) असलेल्या  मदर डेअरी प्रकल्पास आज राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी भेट देऊन पाहणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत  विदर्भ-मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाचा आढावा यावेळी त्यांनी घेतला.

विधिमंडळातील कामकाज आटोपल्यानंतर ना. पंकजाताई मुंडे यांनी मदर डेअरी प्रकल्पास भेट दिली. दूध उत्पादकांकडून याठिकाणी मोठया प्रमाणात दूध संकलन करून ते इतर भागात पाठवले जाते तसेच दुधावर प्रक्रिया करून अनेक उत्पादने याठिकाणी तयार केले जातात. ना. पंकजाताई मुंडे यांनी संपूर्ण प्रकल्पाची पाहणी केली.

विदर्भ आणि मराठवाड्यात नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डद्वारा (NDDB) मदर डेअरीच्या सहकार्याने बुटीबोरी नागपूर व इतर ठिकाणी राबविण्यात येणाऱ्या दुग्धविकास प्रकल्पाच्या अनुषंगाने ना. पंकजाताईनी यावेळी आढावा घेतला. राज्याचे पशुसंवर्धन सचिव एम रामास्वामी, आयुक्त प्रवीणकुमार देवरे, अतिरिक्त आयुक्त डाॅ मुकणे,  विदर्भ-मराठवाडा दुग्ध प्रकल्पाचे संचालक डाॅ बोरानी आदी यावेळी उपस्थित होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावेळी प्रकल्पाची माहिती दिली.
दूध उत्पादकांना प्रोत्साहन देऊन व्यवसायाला चालना मिळावी यासाठी जनजागृती करण्यासह विविध उपाय तसेच सूचना याप्रसंगी ना. पंकजाताई मुंडे यांनी दिल्या.

Back to top button