परळी शहरातील प्रभाग १ , प्रभाग ११ प्रभाग १२ येथे फेर मतदान घेण्याची मागणी मुख्य निवडणूक आयुक्त कडे दीपक देशमुख यांनी केली

…………………………
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)- परळी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, शहरातील काही प्रभागांमध्ये बोगस मतदान झाले आहे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. संध्या दीपक देशमुख व माजी नगराध्यक्ष दीपक रंगनाथ देशमुख यांनी पुनः मतदान करण्याची मागणी केली आहे.परळी वैजनाथ येथील निवडणूक मतदानादिवशी झालेल्या प्रभाग १ , प्रभाग ११ प्रभाग १२ येथे बोगस मतदान, सीसीटीव्ही तपासणी, या तीन प्रभागात फेर मतदार घेण्यात यावे. निवडणूक प्रशासन पोलीस प्रशासनाकडून पक्षपातीपणा उच्चस्तरीय सखोल चौकशी करून कारवाई करावी .
याबाबत राज्य निवडणूक आयुक्तास सौ. संध्या दीपक (नाना) देशमुख, दीपक रंगनाथ देशमुख यांनी निवेदन केले आहे. परळी वैजनाथ येथे दि. २ डिसेंबर २०२५ रोजी परळी शहरातील प्रभाग क्रमांक १, प्रभाग, प्रभाग ११, क्रमांक १२ या ठिकाणी बोगस मतदान झाले आहे. या बूथवर फेर मतदान घेण्यात यावे. या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज चेक करून, कारवाई करावी, व याच ठिकाणी सि.सि टी.व्ही बंद होते. या ठिकाणी बोगस मतदान करण्यात आले. या ठिकाणी देखील फेर मतदान घेण्यात यावे त्याचा आक्षेप मतदान प्रक्रिया चालू असताना घेतला गेला होता. परंतु नियम दाखवून उमेदवार व त्यांचे बुथ प्रतिनिधी यांना उडवाउडवीची उत्तरे व उद्धटपणाची वागणूक या बुथ वर काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून झाली, तसेच पोलीस कर्मचारी देखील विरोधी पक्षाच्या उमेदवारांना चांगली वागणूक व इतर उमेदवारांना जाणीवपूर्वक मतदार केंद्रावर येण्यापासून रोखले, प्रभाग १ वर १९ वर्षाच्या मतदाराचे मतदान ७० वर्षाचा व्यक्ती करताना आढळून आला. या ठिकाणी आक्षेप घेतले गेले असताना आक्षेप घेणाऱ्या उमेदवार व त्याच्या प्रतिनिधीला उडवाउडुची उत्तरे देण्यात आली व अन्याय केला, याच बुथवर सीसीटीव्ही कॅमेरा देखील काळा कपडा लावून बंद करण्यात आला होता. यावरही ऑब्जेक्शन घेतले परंतु त्या ठिकाणी कसल्या प्रकारचा न्यायनिवाडा झाला नाही. प्रभाग १२ मध्ये भाजपचा कार्यकर्ता पवन फुटके व त्याचे इतर साथीदार याने तर खूप उच्छाद मांडला होता मतदान करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक महिलेसोबत बुथ वर येऊन प्रत्येक महिलेचा नातेवाईक आसे भासऊन मतदान करून घेत होता. त्याही गोष्टीला विरोध करून या घटने संदर्भात २ डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेतील घेण्यात आली होती. या ठिकाणी बोगस मतदान झाले आहे. ज्या ठिकाणी आक्षेप घेतल्या त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज तपासून बंद असलेल्या सीसीटीव्हीची तपासणी करून, बंद असलेल्या मतदान केंद्रावर फेर मतदान घेण्यात यावे. व योग्य ती कार्यवाही करावी अशी अपेक्षा या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.आता आपणच निवडणूक व्यवस्थेचे प्रमुख म्हणून सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कठोर कारवाई करून लोकशाही वाचवून उमेदवाराला व जनतेला न्याय द्यावा. अशी मागणी राज्य निवडणूक आयुक्तास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार सौ. संध्या दीपक (नाना) देशमुख,व माजी नगराध्यक्ष दीपक रंगनाथ यांनी केली आहे.



