बीड
बौद्ध समाजाच्या स्मशानभुमीची जागा हडपणार्यांना निवडणुकीत समाज धडा शिकविणार – बंटी सौंदरमल

बौद्ध समाजाच्या स्मशानभुमीची जागा हडपणार्यांना
निवडणुकीत समाज धडा शिकविणार – बंटी सौंदरमल
गेवराई (प्रतिनिधी) दि. ०१ – गेवराई शहरातील बौद्ध समाजाच्या स्मशानभुमीसाठी मागील अनेक वर्षांपासुन समाज बांधव पक्ष संघटना विसरुन एकत्रित लढा देत आहेत. बौद्ध समाजातील लोकांचा मृत्यु झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या देहावर होणारे अंत्यसंस्कार थांबविण्याचे पाप काही नेते मागील अनेक वर्षापासुन करत आहेत. पैसा आणि राजकीय ताकदीच्या जीवावर त्यांनी समाजाला वेठीस धरले आहे. बौद्ध समाजाच्या स्मशानभुमीची जागा हडपणार्यांना या निवडणुकीत समाज मतदानाच्या माध्यमातुन धडा शिकविणार आहे. गेवराई शहरातील स्वाभिमानी बौद्ध समाज बांधव स्मशानभुमीच्या प्रश्नावर आक्रमक होवुन भाजपा उमेदवारांना पराभुत करेल असा विश्वास बंटी सौंदरमल यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ त्यांनी ठिक-ठिकाणी जावुन समाज बांधवांमध्ये जागृती केली आहे.
माजीमंत्री बदामराव पंडित व त्यांच्या कुटूंबीयांनी गेवराई शहरातील बौद्ध समाजाच्या स्मशानभुमीवर हक्क सांगितल्याच्या प्रकरणात बौद्ध समाज रस्त्यावर उतरुन मागील अनेक वर्षापासुन अंदोलने करत आहेत. या प्रकरणात बदामराव पंडित यांनी न्यायालयात धाव घेतली असुन त्यांच्या बाजुने या प्रकरणात निकाल लागल्याचे सांगितले जाते, न्यायालयाच्या निकालानंतरही समाजाने बैठक घेवुन तिव्र संताप व्यक्त करुन या आदेशाला आवाहन देण्याचा निर्णय घेतला होता. या लढ्यात रिपाईचे तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर, बंटी सौंदरमल, विनोद सौंदरमल, धमपाल भोले यांच्यासह बौद्ध समाजातील सर्वपक्षिय कार्यकर्ते सहभागी झाले होते. नगर परिषद निवडणुकीत सुद्धा हा विषय बौद्ध समाजातील मतदारांच्या केंद्रस्थानी आला आहे. मागील दोन दिवसांपासुन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बंटी सौंदरमल व त्यांच्या सहकार्र्यांनी शहरातील सर्व प्रभागात जावुन बौद्ध समाज बांधवांच्या गाठी-भेटी घेवुन जागृती केली आहे.
ऐकीकडे बौद्ध समाजामध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे संभ्रम निर्माण करावयाचा आणि दुसरीकडे समाजाच्या जिल्ह्यास्तरीय नेत्यांकडे जावुन फोटो काढायचे, हे कसे चालेल ? विधानसभा निवडणुकीनंतर माजी अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आ. विजयसिंह पंडित यांनी बौद्ध विहार बांधकाम, अभ्यासिकेचे बांधकाम यासह विर लहुजी नगर मध्ये आरोग्य उपकेंद्र बांधकाम या सारख्या अनेक विकास कामांना मंजुरी मिळवुन देत समाज बांधवांना हक्काचा पीटीआर मिळवुन दिला आहे. सातत्याने शिवछत्र परिवाराने आम्हाला मदत केली असुन महापुरुषांच्या जन्मोत्सवात त्यांची भुमीका अग्रेसर राहिली आहे. त्यामुळे समाज या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागे भक्कम उभा राहणार असल्याचे यावेळी बंटी सौंदरमल यांनी सांगितले. पुढे बालतांना ते म्हणाले की, सातत्याने समाजातील वेगवेगळ्या गटांमध्ये संभ्राम पसरवुन पोळी भाजण्याचे काम करणार्यांना आता समाज बांधवांनी ओळखले आहे. बौद्ध समाजाच्या अंत्यसंस्काराची जागा सुद्धा यांना हडप करावयाची आहे, अशा लोकांच्या ताब्यात नगर परिषद दिल्यास समाज बांधवांना हे लोक वेठीस धरतील त्यामुळे सर्वांनी या निवडणुकीत बदामराव पंडित आणि भाजपा उमेदवारांचा पराभव करावा असे आवाहन बंटी सौंदरमल यांनी केले. बंटी सौंदरमल यांच्या प्रचाराला समाज बांधवांकडुन मोठा प्रतिसाद मिळत असुन बौद्ध समाज बांधवांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पारडे जड दिसत आहे. बदामराव पंडित यांनी बौद्ध समाजाच्या स्मशानभुमीच्या जागेवर केलेल्या अतिक्रमणाचा विषय ऐन निवडणुक प्रचारात एैरणीवर अल्यामुळे त्यांची चांगलीच कोंडी झाल्याचे दिसत आहे.
![]()



