बीड
सत्ताधाऱ्यांनी कितीही सभा घेतल्या तरी, बीडचा मतदार आमच्या सोबत – आ. संदीप क्षीरसागर

सत्ताधाऱ्यांनी कितीही सभा घेतल्या तरी, बीडचा मतदार आमच्या सोबत – आ. संदीप क्षीरसागर
तुतारी आणि मशालचे वातावरण बनले
बीड दि.३०(प्रतिनिधी) सत्ताधाऱ्यांनी कितीही सभा घेतल्या तरी, बीडचा सामान्य मतदार आमच्या सोबत आहे. त्यामुळे विजय निश्चित असल्याचा विश्वास आ.संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला. नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ प्रभाग १४, ४, २३, २४ मध्ये रविवारी (दि.३०) रोजी झालेल्या कॉर्नर सभांमध्ये ते बोलत होते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना ठाकरे पक्ष आघाडीनेच, आघाडी घेतल्याने शहरात तुतारी व मशालचे वातावरण निर्माण झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,समाजवादी पार्टी आघाडीच्या बीड नगराध्यक्षपदाच्या उमेदवार स्मिता विष्णू वाघमारे यांच्या व प्रभाग १४ नगरसेवक पदाच्या उमेदवार कल्याणी अशोक राजपुरे, धम्मप्रिया रवी वाघमारे यांच्या प्रचारार्थ पंचशील नगर, प्रभाग ०४ भारत भास्कर कांबळे, मंगलाबाई संजय चांदणे यांच्या प्रचारार्थ काळा हनुमान ठाणा परिसर, पेठ बीड येथे सभा तर प्रभाग २३ आणि २४ मध्ये खुर्शीदमिया मोमीन शाहमोहम्मद, शेख बानुबेगम महेमूद , जोया अनम मोहम्मद मेसीयुद्दीन, शेख अफसर शेख महंमद यांच्या प्रचारार्थ मोमीनपुरा भागात आ. संदीप क्षीरसागर यांनी कॉर्नर सभा घेतली. यावेळी बोलताना आ. संदीप क्षीरसागर म्हणाले की, बीडमध्ये सभा घेण्याची स्पर्धा लागलेली आहे. पण सत्ताधाऱ्यांनी कितीही सभा घेतल्या तरी, बीडचा सामान्य मतदार आमच्यासोबत असल्याचा आ.संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला. येत्या २ डिसेंबर रोजी तुतारी आणि मशाल चिन्हा समोरील बटन दाबून आमच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे आवाहन केले. यावेळी माजी आ. सय्यद सलीम, माजी आ.संगिता ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया चे प्रदेशाध्यक्ष तसेच आंबेडकरवादी चळवळीतील प्रमुख चेहरा अजिंक्य चांदणे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्मिता विष्णू वाघमारे व नगरसेवक पदाचे उमेदवार आणि मतदार हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.



