📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

तपनेश्वर व मिलिंद नगर येथे प्रिती आहेर व संजय भोसले यांच्या कॉर्नर सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

तपनेश्वर व मिलिंद नगर येथे प्रिती आहेर व संजय भोसले यांच्या कॉर्नर सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रभाग ६ मध्ये तुतारीचा नारा ; नागरिकांचा मोठा प्रतिसाद

‘तुतारी’वर विश्वास ठेवा; नगराध्यक्षासह उमेदवारांना विजयी करा आमदार पवारांचे आवाहन

जामखेड प्रतिनिधी :
जामखेड नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट)च्या प्रचाराला वेग येत असून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संध्याताई शहाजी राळेभात तसेच प्रभाग क्र.६ चे उमेदवार प्रितीताई राहुल आहेर आणि संजय भानुदास भोसले यांच्या प्रचारार्थ तपनेश्वर गल्ली जिल्हा परिषद शाळा आणि मिलिंद नगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर ब्लॉक समोर कॉर्नर सभा घेण्यात आली.यासाठी नागरिकांचा मोठा प्रतिसाद दिसून आला.

यावेळी काॅर्नर सभेत नागरिकांशी बोलताना आमदार रोहित पवार यांनी स्थानिक विकास, मूलभूत सुविधा, महिलांसाठी उपक्रम आणि प्रभागातील प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.आगामी पाच वर्षांत प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प व्यक्त करत आमदार रोहित पवार यांनी तुतारी’वर विश्वास ठेवा.नगराध्यक्षासह उमेदवारांना विजयी करा असे ही आवाहन नागरिकांना केले.

यावेळी पक्षातील नेते,स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.सभेच्या शेवटी ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हासमोरील बटण दाबून उमेदवारांना विजय मिळवून देण्याचे आवाहन करण्यात आले.

Back to top button