बीड
प्रभाग क्रमांक ७ मधून इच्छुक उमेदवार : सौ.कल्पना येवले आणि योगेश येवले दाम्पत्यांचे दमदार शक्तिप्रदर्शन

प्रभाग क्रमांक ७ मधून इच्छुक उमेदवार : सौ.कल्पना येवले आणि योगेश येवले दाम्पत्यांचे दमदार शक्तिप्रदर्शन
जामखेड प्रतिनिधी :जामखेड नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांची रणधुमाळी रंगत चालली असून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना आजपासून सुरुवात झाली. आज दिनांक १० नोव्हेंबर २०२५ रोजी नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी विविध इच्छुकांनी मुलाखत दिली. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ७ मधील इच्छुक उमेदवार सौ. कल्पना योगेश येवले व योगेश सुधीर येवले यांनी अत्यंत दिमाखात हजेरी लावत शक्तिप्रदर्शन केले.यावेळी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी मुलाखतीसाठी भाजपा पक्षाचे जामखेड निवडणूक प्रभारी शेखर खरमरे, जिल्हाध्यक्षा महिला मोर्चा प्रतिभा रेणुकर, जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर,सभापती पै.शरद कार्ले ,शहर मंडल अध्यक्ष संजय काशिद,तालुका अध्यक्ष बापुराव ढवळे,प्रविण चोरडीया,ॲड.अजय काशिद,मनोज कुलकर्णी,रविंद्र सुरवसे,ॲड.प्रविण सानप, व्यापारी संघटनेचे शहराध्यक्ष पिंटूशेठ बोरा,नगराध्यक्षपदाच्या इच्छुक सुनिता मधुकर राळेभात,प्रांजल चिंतामणी, रोहिणी काशिद,वैशाली झेंडे तसेच नगरसेवक पदाचे शेकडो इच्छुक उमेदवार व त्यांचे समर्थक उपस्थित होते.
सकाळपासूनच शहरात मुलाखती चा माहोल होता. अखेर निश्चित वेळेपूर्वीच येवले दाम्पत्य हे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह, ढोल-ताशांच्या गजरात आणि वाजत-गाजत मुलाखत स्थळावर दाखल झाले.अनेक इच्छुक उमेदवारांनी साध्या पद्धतीने मुलाखत प्रक्रियेला उपस्थिती लावली असताना, येवले दाम्पत्यांचा मिरवणुकीसह झालेला प्रवेश हा चर्चेचा ठरला.
सौ. कल्पना येवले व योगेश येवले यांनी गेल्या काही काळात प्रभागातील विविध सामाजिक उपक्रमांमुळे आपली ओळख निर्माण केली आहे.तसेच येवले यांनी कोरोना काळातही नागरिकांच्या मदतीसाठी जनसेवक म्हणून काम केले. या भयानक परिस्थितीत अनेक नागरिक मयत झाले. त्यावेळी येवले दाम्पत्यांनी भेट घेत सांत्वन केले व त्या कुटुंबात मदत देण्याचे काम केले. अशी सामाजिक बांधिलकी जपली.
प्रभाग क्रमांक ७ मध्ये विविध पक्षांचे अनेक इच्छुक मैदानात असल्याने स्पर्धा रंगतदार होणार असल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र, आजच्या जोरदार मिरवणुकीने येवले दाम्पत्याने आपली ताकद दाखवत निवडणूक समीकरणे अधिकच रोचक केल्याचे स्पष्ट दिसते.आता पक्ष निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, येवले दाम्पत्याला पक्षाचा हिरवा झेंडा मिळणार का याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.



