बीड

प्रभाग 14 मध्ये आरती रंजित बनसोडे यांच्या नेतृत्वाची गरज

प्रभाग 14 मध्ये आरती रंजित बनसोडे यांच्या नेतृत्वाची गरज
नागरिकांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे एकमुखी मागणी
बीड (प्रतिनिधी):-बीड नगर परिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय, बीड येथे नगरसेवक पदाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये प्रभाग क्रमांक 14 मधून आरती रंजीत बनसोडे यांनी आपल्या प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत मुलाखत दिली.
यावेळी बनसोडे यांनी प्रभागातील नागरिकांचे प्रश्न, विकासाच्या गरजा आणि शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपले स्पष्ट आणि ठोस व्हिजन पक्ष पदाधिकार्‍यांसमोर मांडले. त्यांनी सांगितले की, नागरिकांच्या आशीर्वादाने आणि पक्षाच्या आदेशानुसार आगामी निवडणुकीत सहभागी होऊन समाजहिताचे कार्य पुढे नेण्याचा माझा संकल्प आहे.
या मुलाखतीदरम्यान पक्षातील स्थानिक कमिटीने इच्छुक उमेदवारांचे सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक कार्याचा सविस्तर आढावा घेतला. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार लवकरच अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले.
दरम्यान, प्रभाग 14 मधील नागरिक आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालयात एकमुखी मागणी केली की, सर्वसमावेशक आणि कार्यक्षम नेतृत्व असणार्‍या चेहर्‍यालाच तिकीट द्यावे.
नागरिकांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली  विकासकामे ही मागील पाच वर्षांत पूर्ण झाली आहेत, आणि उर्वरित कामे पूर्ण करण्याची क्षमता फक्त आरती बनसोडे यांच्यात आहे. या पार्श्वभूमीवर आरती बनसोडे यांच्या उमेदवारीसाठी प्रभागातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, त्यांचा जनसंपर्क वाढता प्रभाव आणि विकासाभिमुख कार्यपद्धतीमुळे प्रभाग 14 मध्ये चांगली चर्चा रंगली आहे.
Back to top button