बीड
उपळी जिल्हा परिषद गटासाठी रोहिदास पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा.

उपळी जिल्हा परिषद गटासाठी रोहिदास पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा.
● आ.प्रकाश दादा सोळंके यांनी उमेदवारी द्यावी बंजारा समाजाची मागणी.
वडवणी (प्रतिनिधि)- महाराष्ट्र राज्यात नुकतेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका जाहीर झाली असून, बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट,पंचायत समिती गणाचे आरक्षण जाहीर झाले असून, बीड जिल्ह्यातील सर्वच नेते मंडळी जोराने कामाला लागले आहेत, आपापल्या परीने उमेदवारी चाचपणी सुरू केली आहे.वडवणी तालुक्यातील उपळी जिल्हा परिषद गट हा ओबीसी समाजाला आरक्षित झाला आहे. या गटातून सामाजिक कार्यकर्ता तथा बंजारा पॅंथरचे अध्यक्ष इंजि.रोहिदास पवार यांच्या नावाची सर्कलमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.विधानसभा निवडणुकीत रोहिदास पवार यांनी आमदार प्रकाश दादा सोळंके यांना बिनशर्त पाठिंबा देऊन माजलगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वच तांड्यामध्ये प्रचार करून बंजारा समाज वन साईट मतदान करून आमदार प्रकाश दादा सोळंके यांना निवडून आणलेला आहे.
यावेळी आमदार प्रकाश दादा सोळंके यांनी रोहिदास पवार यांना शब्द दिला होता की जिल्हा परिषद निवडणुकीत नक्कीच तुमच्या विचार करू अशा शब्द दिलेला होता हा शब्द सार्थ ठरवावा असी समाजाची मागणी आहे,
तरी रोहिदास पवार यांना उमेदवारी मिळावी म्हणून 17 ऑक्टोंबर रोजी बंजारा समाज बांधवांचा शिष्टमंडळ आमदार प्रकाश दादा सोळंके यांना भेटून या विषयावर चर्चा देखील केली आहे.मागील काही दिवसापासून रोहिदास पवार यांनी तांडा,वाडी,वस्तीत लोकांसोबत गाठी-भेटी सुरू केलेले असून समाजामध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
प्रकाश दादा यांनी विधानसभा निवडणुकीत दिलेला शब्द सार्थ ठरवला तर ग्रामीण भागातील माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला नक्कीच न्याय मिळेल अशी अपेक्षा इंजि.रोहिदास पवार यांनी केली आहे. या सर्व गोष्टीचा आढावा घेऊन दादांनी रोहिदास पवार यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी विकास पवार,रोहिदास राठोड,भानदास राठोड, प्रकाश पवार,अरुण चव्हाण, विलास चव्हाण,प्रकाश चव्हाण,देविदास राठोड, विनोद पवार,नितीन पवार, एकनाथ आडे शेषराव जाधव,करण राठोड,मिरा पवार,आशा राठोड,वंदना पवार, चिगूबाई राठोड व बंजारा समाज बांधव करत आहेत.


