बीड

प्रकाश आंबेडकरांचा अवमान करणाऱ्यांना कायद्याने उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही – वंचित बहुजन आघाडी

प्रकाश आंबेडकरांचा अवमान करणाऱ्यांना कायद्याने उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही – वंचित बहुजन आघाडी
द्वेष पसरवणाऱ्यांच्या विरोधात थेट गुन्हे दाखल करणार–अजय सरवदे
बीड (प्रतिनिधी) . — वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वारस व संविधानतज्ज्ञ मा.खा. ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे देशातील प्रतिष्ठित संवैधानिक विचारवंत व जननेते आहेत.
तथापि, अलीकडील काळात काही असामाजिक प्रवृत्तीचे लोक फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स (ट्विटर) आणि इतर सामाजिक माध्यमांवर त्यांच्या विरोधात अक्षेपार्ह, खालच्या दर्जाचे, जातीय आणि असत्य विधान करून समाजात द्वेष, तिरस्कार आणि अशांती पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत.
अशा प्रकारच्या पोस्ट, कॉमेंट्स आणि व्हिडिओंनी केवळ एका व्यक्तीच्या सन्मानावर आघात होत नाही, तर भारतीय संविधानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादांचे (अनुच्छेद 19(2)) उल्लंघन होते. परिणामी, समाजात जातीय वैमनस्य आणि सार्वजनिक शांततेचा भंग होण्याची शक्यता निर्माण होते.
संविधानिक व कायदेशीर तरतुदी अनुच्छेद 19(1)(a): अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार, अनुच्छेद 19(2): सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता आणि सन्मानाच्या रक्षणासाठी मर्यादा, अनुच्छेद 21: सन्मानाने जगण्याचा मूलभूत अधिकार
भारतीय दंड संहिता (IPC) कलम 153A: जातीय, धार्मिक द्वेष पसरविणे, कलम 295A: धार्मिक भावना दुखावणे, कलम 499, 500: मानहानी, कलम 504: जाणूनबुजून अपमान करून शांततेचा भंग करणे, कलम 505(2): जातीय वा धार्मिक वैमनस्य वाढविणारी वक्तव्ये
माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 (IT Act) कलम 66A (संशोधित): अपमानास्पद वा खोटे संदेश प्रसारित करणे, कलम 67: इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अश्लील वा अपमानास्पद मजकूर प्रसारित करणे, कलम 69A: सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण करणारी खाती अवरोधित करण्याची तरतूद
वंचित बहुजन आघाडीच्या मागण्या सोशल मीडियावरील अशा अकाउंट्सची चौकशी करून मा. प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात द्वेषपूर्ण मजकूर पोस्ट करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, संबंधितांच्या मोबाईल क्रमांक, ई-मेल, IP अ‍ॅड्रेस व अकाउंट्सची तपासणी करण्यात यावी, अशा सर्व पोस्ट्स तात्काळ काढून टाकून, कलम 153A, 295A, 499, 500, 504, 505(2) आणि IT Act अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, पुढील काळात अशा प्रकारची द्वेषपूर्ण कृत्ये होऊ नयेत म्हणून पोलीस विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
 वंचित बहुजन आघाडीचा ठाम इशारा संविधानाचा, विचारांचा आणि नेत्यांच्या सन्मानाचा अपमान सहन केला जाणार नाही. संविधानविरोधी आणि द्वेष पसरविणाऱ्यांना कायद्यानेच उत्तर दिले जाईल.
यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रशांत बोराडे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे, ज्येष्ठ नेते डॉ. नितीन सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कवठेकर, सचिन मेघडंबर, अर्जुन जंजाळ, लखन जोगदंड, संदीप जाधव, मिलिंद सरपते, आकाश जावळे, उमेश गुळवे, अनिल वीर, प्रकाश उजगरे, राजेशकुमार जोगदंड यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button