बीड

साकोलीत अवैध रेती माफियावर पोलिसांची धडक कारवाई! 

साकोलीत अवैध रेती माफियावर पोलिसांची धडक कारवाई!

पोलीस प्रशासन सज्ज; महसूल विभाग कोमात!
दै,सूर्योदय:- निश्चल येनोरकर
भंडारा/ साकोली:- साकोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत मौजा सिरेगाव जंगल शिवारात नवेगाव जाणाऱ्या रस्त्यावर १८ किलोमीटर दक्षिणेस पेट्रोलिंग करीत असताना, अवैध रेती वाहतूक माफिया विरुद्ध मोठी शिताफीची धडक कारवाई करून, दोन आरोपींना ताब्यात घेऊन,२२ लाख ११ हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला असल्याने, महसूल विभाग कोमात गेल्याची,सर्वत्र चर्चा होत आहे, या महसूल विभागा सोबत रेती माफियाची साठ गाठ असल्याची परिसरात चर्चा होत आहे,
साकोली पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेऊन ,१) जीवन मारुती चाचरे वय ३८ वर्ष रा, खंडाळा ता. साकोली जि. भंडारा
२)दीपक अशोक चांदेवार वय ३१ वर्ष रा सासरा,ता. साकोली,जि.भंडारा
त्यांच्याकडून एक पिवळ्या रंगाच्या अशोक लेलँड कंपनीच्या ट्रक एम एच ३६/ए.ए.४६५० , किंमत २२ लाख रुपये, दोन ब्रास रेती ११,००० रुपये असा एकूण मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन साकोली येथे अपराध क्र. ५७७/२०२५ कलम ३०५ (ई) ४९,मा.न्या,स२०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोहवा.अनिफ राऊत करीत आहेत
महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे महसूल विभागावर वचक नसल्याची चर्चा जिल्हाभर रंगू लागली आहे. यावर नागरिकांचे शंका निर्माण होत असल्याने नागरिकात चर्चेला पाझर फुटत आहे . आता महसूल विभाग कोमात राहणार कि काय केव्हा झोप उघडणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Back to top button