बीड
एंड्यूरन्स टेक्नॉलॉजि्स लिमिटेड व गेवराई तालुका परिवर्तन संघ यांचा अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात

एंड्यूरन्स टेक्नॉलॉजि्स लिमिटेड व गेवराई तालुका परिवर्तन संघ यांचा अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात
गेवराई (प्रतिनिधी) छ.संभाजीनगर येथील अग्रगण्य कंपनी एंड्यूरन्स टेक्नॉलॉजि्स लिमिटेड यांनी सेवक ट्रस्ट च्या माध्यमातून व गेवराई तालुका परिवर्तन संघाच्या वतीने बीड जिल्ह्यातील गेवराई तथा शिऊर कासार या तालुक्यातील जवळपास 32 गावे जी गोदावारी व सिंदफाना या दोन नद्यांच्या किनारी वसलेल्या गावांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे अतोनात नुकसान झालेल्या १००० पेक्षा जास्त कुटुंबाना मदतीचा हात पुढे केला.
या कंपनीने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधी मधून व ॲड.संजयभाऊ काळे यांच्या सहकार्याने या आकस्मित घटनेला प्रतिसाद देताना एक महिनाभर पुरेल इतका प्रेमाचा शीधा(किराणा) दीपावली निमित्त चिवडा लाडू तसेच शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना स्कुल बॅग, वह्या तसेच पेन पेन्सिल किटचे गेवराई, शिरूर, बीड तालुक्यातील ३२ गावात वाटप केले.
एंड्यूरन्स टेक्नॉलॉजि्स लिमिटेड यांनी सेवक ट्रस्ट च्या माध्यमातून, छ. संभाजीनगर जिल्ह्यात वेगवेगळ्या जवळपास 19 गावात घनदाट जंगल निर्माण करून आजपर्यंत 9 लाख झाडे लावून ती प्राणपनाने जगवली आहेत व या वर्षापासुन दरवर्षी 4 लाख झाडे लावून जगवणार आहे. या कंपनीने छ. संभाजीनगर जिल्ह्यातील जवळस 50 गावे विकसित केली असून उद्योगनगरी वाळूज येथे मुलांना प्रशिक्षित करून जॉब मिळवून देण्यासाठी जागतिक पातळीवरचे एक कौशल्य विकास केंद्र सुरु केलं आहे. या केंद्रामध्ये मध्ये प्रशिक्षित होऊन जवळपास 2000 च्या वर मुलांना रोजगार प्राप्त झाला आहे.
एंड्यूरन्स टेक्नॉलॉजि्स लिमिटेड यांनी सेवक ट्रस्ट च्या माध्यमातून बीड जिल्ह्यात अतिवृष्टी तथा पूरग्रस्त गावांमध्ये मदत करावी या साठी गेवराई तालुका परिवर्तन संघाचे अध्यक्ष ॲड.श्री संजय काळे यांनी खूप प्रयत्न केले. कंपनीने त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देताना स्वतः सर्व्हे करून मदत देण्याचे ठरविले.
या मदत कार्यात कंपनीचे सहा. महा व्यवस्थापक श्री उदय दूधगावकर, व्यवस्थापक श्री अनुप महाजन, सहा. व्यवस्थापक श्री सुनील शिंदे यांनी खूप प्रयत्न केले. ही मदत वितरित करताना श्री यश काळे, मेजर कापरे, श्री सुनील काळे, श्री गुळवे,टेकाळे अन्सरभाई, श्री राजेंद्र चव्हाण, अमोल तिपाले,संतोष सुरवसे, भूषण चव्हाण, श्यामराव गायकवाड, दिगंबर कोकाटे यांच्या सहकार्या केले.
एंड्यूरन्स टेक्नॉलॉजि्स लिमिटेड या कंपनी प्रमाणे इतर कंपन्यानीतसेच समाजातील दात्यांनी समोर येऊन या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी ग्रामीण भागातील जनतेला भरभरून मदत व सहकार्य करावे असे आवाहन गेवराई तालुका परिवर्तन संघाचे अध्यक्ष ॲड.श्री संजय काळे यांनी केले



