बीड

दलित महासंघाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी लालासाहेब दुनघव यांची निवड

दलित महासंघाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी लालासाहेब दुनघव यांची निवड

बीड (प्रतिनिधी):-दलित महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.डॉ. मच्छिंद्र सकटे यांच्या आदेशानुसार दलित महासंघाच्या राज्य उपाध्यक्षपदी लालासाहेब दुनघव यांची निवड करुन त्यांना प्रा.डॉ.मच्छिंद्र सकटे यांनी नियुक्तीपत्र दिले आहे. यावेळी बीड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर, भाजपा युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष अनिल चांदणे, संपादक दिपक थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी लालासाहेब दुनघव म्हणाले की, दलित महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. डॉ.मच्छिंद्र सकटे यांनी जी माझ्यावर जबाबदारी दिली आहे त्याचे मी प्रामाणिकपणे काम करुन महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यात महासंघाचे संघटन उभा करेल अशी ग्वाही दुनघव यांनी यावेळी दिली. त्यांच्या निवडीबद्दल दलित महासंघाचे बीड जिल्हाध्यक्ष मसु पवार, ज्येष्ठ नेते गोरखभाऊ मोमीन, राजु भाऊ झाडे व आशाबाई धुताडमल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Back to top button