संपादकीय

“जनता जनसंवादातून शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवणार – आमदार बाबाजी काळे”

 “कौशल्यविकासातून तरुणांना रोजगारक्षमतेकडे – खेड तालुक्यात दोन महत्त्वाचे उपक्रम यशस्वी”

सुहास सावंत / पुणे 

खेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आणि धरणग्रस्त बांधबंदिस्त भागातील नागरिकांच्या समस्यांवर थेट संवाद साधण्यासाठी आमदार बाबाजी रामचंद्र काळे यांच्या पुढाकाराने “जनता जनसंवाद” हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसन, भरपाई, थकित प्रकरणे व प्रशासनिक अडचणी दूर करण्यासाठी ही बैठक शुक्रवार, दि. १० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता मोहे-करंजविहीरे येथे होणार आहे.

या जनसंवाद बैठकीत सर्व संबंधित शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आमदार काळे म्हणाले, “जनतेच्या समस्या फक्त ऐकायच्या नाहीत तर त्यावर ठोस तोडगा काढायचा हा आमचा संकल्प आहे. धरणग्रस्तांचा न्याय मिळवून देण्यासाठी हा संवाद मंच उपयुक्त ठरेल.”

याच पार्श्वभूमीवर, शहीद राजगुरू शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राजगुरूनगर (ता. खेड, जि. पुणे) येथे “अल्पकालीन रोजगारक्षम कार्यक्रमाचे उद्घाटन आणि प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ” आमदार काळे यांच्या हस्ते संपन्न झाला.

या कार्यक्रमात आमदार काळे यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. त्यांनी सांगितले की, “कौशल्यविकासाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणही उद्योग क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करू शकतात. शिक्षणासोबत व्यावहारिक प्रशिक्षण मिळाल्यास रोजगाराच्या संधी अनेक पटींनी वाढतात.”

कार्यक्रमात संस्थेच्या प्राचार्यांनी विविध प्रशिक्षण उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन केले.

दोन्ही उपक्रमांमुळे खेड-आळंदी मतदारसंघात उत्साहाचे वातावरण असून, जनता जनसंवाद व रोजगारक्षम प्रशिक्षण या माध्यमातून लोकप्रतिनिधी आणि जनतेतील विश्वासाचे नाते अधिक बळकट होत आहे.

Back to top button