संपादकीय

सौ. के.एस.के. कनिष्ठ महाविद्यालयातील मुलींचा नेटबॉलचा संघ शालेय विभागीय स्पर्धेसाठी पात्र


बीडः प्रतिनिधीः क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय नेटबॉल क्रीडा स्पर्धेत सौ. के.एस.के. कनिष्ठ महाविद्यालयाचा 19 वर्षाखालील मुलींच्या संघाने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. या क्रीडा स्पर्धेत संघनायक तनुजा हाडुळे, गितांजली शेळके, ॠतुजा शिंदे, अनुराधा गायकवाड, गौरी राउत, अंकिता गावडे, शिवानी शिंदे, सायली बनसोडे, प्रगती तांगडे, आरती शेळके, सिध्दी कानडे, श्रुती ठोकळ या खेळाडू विद्यार्थीनींचा सहभाग होता.
तसेच विभागीय स्पर्धेत बीड जिल्हयाचे प्रतिनिधीत्व करण्याचा बहुमान सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाला मिळवून दिला.
या यशाबद्दल नवगण शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. योगेश क्षीरसागर, संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ. दीपा क्षीरसागर, माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभुषण क्षीरसागर, संचालक डॉ. सारीका क्षीरसागर, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. सुधाकर गुट्टे, डॉ. विश्वांभर देशमाने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ. संजय पाटील देवळाणकर, उपप्राचार्य डॉ. अनिता शिंदे, कमवि चे उपप्राचार्य नारायण काकडे, पर्यवेक्षक श्री जालिंदर कोळेकर, क्रीडा विभागप्रमुख डॉ. भागचंद सानप, अमृतसिंग बिसेन, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी यांनी खेळाडूंचे अभिनंदन करुन पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.

Back to top button