बीड

जरुड येथे आई नवसाई देवी नवरात्र कीर्तन महोत्सवाचे आयोजन

जरुड येथे आई नवसाई देवी नवरात्र कीर्तन महोत्सवाचे आयोजन
बीड (प्रतिनिधी) :तालुक्यातील जरुड (ता. बीड) येथे सर्व भाविक भक्तांच्या उपस्थितीत व विविध संत-महंतांच्या आशिर्वादाने आई नवसाई देवी नवरात्र कीर्तन महोत्सव सोमवारी (दि.२२ सप्टेंबर) उत्साहात सुरुवात होत आहे.हा महोत्सव मंगळवार दि. ३० सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.
या कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन ह.भ.प. शांतीब्रह्म नवनाथ महाराज (गोरक्षनाथ टेकडी) व ह.भ.प. अखंडानंद गिरीजी महाराज (श्रीक्षेत्र भवानीगड) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला आहे. या महोत्सवात राज्यभरातील मान्यवर कीर्तनकार व संत सहभागी होत असून, भाविक भक्तांसाठी अध्यात्मिक मेजवानी उपलब्ध झाली आहे.
कार्यक्रमात ह.भ.प. स्वरमुर्ती रामेश्वर महाराज शास्त्री (लोणी शहाजनपूर), ह.भ.प. प्रतिभाताई गायकवाड, ह.भ.प. भागवताचार्य नवनाथ महाराज नाईकवाडे, ह.भ.प. युवाकीर्तनकार माऊली महाराज, ह.भ.प. बालकीर्तनकार सोहम महाराज सातपुते, ह.भ.प. सिताताई आवाड, ह.भ.प. भगवंत महाराज पुरी, ह.भ.प. गणेश महाराज लोंढे यांच्यासह अनेक मान्यवर कीर्तनकारांचे कीर्तन सेवा होणार आहे.
तसेच या महोत्सवात विविध भजनी मंडळे, आराधी मंडळे व महिला बचत गट सहभागी होणार असून, कीर्तन-भजन-आराद्याचा अखंड जलसा रंगणार आहे. संघर्षयोध्दा मा. श्री. मनोज दादा जरांगे पाटील व अनेक मान्यवर संत-महंतांचे मार्गदर्शनही लाभणार आहे.
या महोत्सवाचे आयोजन समस्त गावकरी मंडळींनी केले असून, गावातील तरुण, मंडळी व महिला बचत गट मोठ्या उत्साहाने तयारीत सहभागी झाले आहेत.
या महोत्सवाच्या निमित्ताने भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, हजारो भाविक भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

Back to top button