बीड

भाजपच्या वतीने जामखेड शहरातील मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम

भाजपच्या वतीने जामखेड शहरातील मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम

सेवा पंधरवडा’ ठरला स्वच्छतेचा सण ; स्वच्छता मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद

जामखेड –भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा २०२५ अंतर्गत जामखेड शहरातील मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जामखेड शहर मंडल भाजपच्या वतीने शुक्रवार, दि. १९ सप्टेंबर रोजी शहरातील तपनेश्वर महादेव मंदिर, जुने महादेव मंदिर, संतोषी माता मंदिर, कुंभार तळे परिसरात स्वच्छता करण्यात आली.

या उपक्रमात संयोजक प्रविण चोरडिया,माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात,शहर मंडल अध्यक्ष संजय (काका) काशिद, प्रा. संजय राऊत (सर), नगरसेवक मोहन पवार,मोहन (मामा) गडदे,तात्याराम पोकळे, राजेश वाव्हळ,ज्ञानेश्वर अंदुरे,राम पवार,प्रवीण होळकर,बाळासाहेब गायकवाड,राहुल राऊत,प्रवीण बोलभट्,विक्रांत घायतडक,डॉ.अशोक बांगर,विजय कुलकर्णी, उमेश माळवदकर,भाजपा महिला आघाडीच्या लक्ष्मीताई पवार, रुकसाना पठाण आदी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.या उपक्रमामुळे शहरातील मंदिर परिसर स्वच्छतेने उजळून निघाला असून नागरिकांनी भाजपच्या या उपक्रमाचे स्वागत केले.

Back to top button