बीड

कचऱ्याच्या दुर्गंधीने आळंदीकर हैराण! बायपास रोडवरील सडलेला कचरा – नागरिकांच्या आरोग्याशी खेळ ?

कचऱ्याच्या दुर्गंधीने आळंदीकर हैराण!

बायपास रोडवरील सडलेला कचरा – नागरिकांच्या आरोग्याशी खेळ ?

पुणे/आळंदी:-मुख्याधिकारी साहेब पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा आहेत. आणि त्यांना स्वच्छतेची जास्त सवय आहे. हा विषय गंभीर्याने घ्या.बांधकाम विभाग सोडून तुमचे थोडे लक्ष स्वच्छता नागरिकाच्या आरोग्याकडे पण असू द्या

आळंदी बायपास रोडवर दिवसेंदिवस वाढणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. दुर्गंधीचा वास इतका पसरतो की, श्वास घेणेही कठीण झाले आहे. रस्त्यावर जाणाऱ्या शाळकरी मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण या दुर्गंधीमुळे वैतागले आहेत. “दररोज या रस्त्याने मुलांना शाळेत सोडताना त्यांचे आरोग्य धोक्यात टाकावे लागत आहे,” असा संताप एका पालकांनी व्यक्त केला.
“प्रशासनाला अनेक वेळा तक्रारी करूनही माध्यमांनी बातम्या करूनही कोणतीही कारवाई होत नाही. निवडणुकीत मत मागायला मात्र सगळे येतात, पण आमच्या आरोग्याची चिंता कोणाला नाही,” अशी प्रतिक्रिया एका नागरिकाने दिली.
बायपास रोड हा वाहतुकीसाठी महत्वाचा मार्ग असून, सकाळ-संध्याकाळ शेकडो वाहने या मार्गाने जातात. दुर्गंधीमुळे प्रवास त्रासदायक होतोच, शिवाय पावसाळ्यात हा कचरा विघटित होऊन संसर्गजन्य आजार पसरवू शकतो, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
“कचरा त्वरित उचलून योग्य व्यवस्थापन न झाल्यास आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल,” असा इशारा नागरिक संघटनांनी दिला आहे.
नागरिकांनी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करून स्वच्छतेस प्राधान्य द्यावे, अशी जोरदार मागणी केली आहे.

Back to top button